भटक्या विमुक्त जातीचा आज स्वातंत्र दिवस, कसे मिळाले स्वातंत्र्य? ते वाचाच

File Photo
File Photo

नांदेड- ब्रिटिश सम्राटाच्या प्रचंड अर्थिक शोषणातून मुक्त होण्यासाठी १८५७ ला पहिला विद्रोह झाला. ज्याला प्रथम स्वातंत्र्य युद्ध मानले गेले. या उठावात अनेक क्रांतीकारकाचे योगदान होते. याशिवाय अनेक क्रांतीकारी जाती-जमाती सक्रिय होत्या. त्यामुळे या उठावाने ब्रिटिश यंत्रणा पुर्णतः हतबल झाली.ब्रिटीशांना पुढे भारतात राहुन राज्य कारभार करणे कठीण झाले होते. पण ब्रिटिशांना कुठल्याही परिस्थितीत भारतावरचे सम्राज्य टिकवून ठेवायचे होते. असे असले तरी, त्या उठावाच्या तिव्रतेमुळे एकही ब्रिटिश अधिकारी भारतात येणास तयार नव्हता. 

तेव्हा ब्रिटीशांनी यावर नवी रणनिती आखली आणि भारतील ब्रिटिशांना मदत करण्यासाठी तयार संस्थानिक राजा यादी केली. दुसऱ्या रणनितीमध्ये क्रांतीकारकांचा बंदोबस्त करण्यासाठी रणनिती आखली गेली आणि तिसरी रणनिती उठावातील क्रांतीकारी जातींना कायदेशीर उध्वस्त करणे या प्रमाणे राणीच्या जाहीर नामानंतर ब्रिटिशांनी तिसरा कायदा बनवून १९८ जाती ह्या जन्मजातच गुन्हेगार असल्याचा कायदा तयार केला, असे संशोधक राजीव दिक्षित या संशोधनावरुन स्पष्ट होते.

स्वातंत्र्यानंतरही पाच वर्ष १६ दिवस गुन्हेगार जिवन

ब्रिटिशांच्या एकूण सम्राज्य सत्ताकाळापैकी १८५७-१९४७ म्हणजे १०० वर्षाचा काळ उठावानंतर ब्रिटिशांनी उपभोगले. भारत स्वातंत्र्यनंतर ब्रिटिशांना मदत करणारे हे आजही सत्तेची फळे चाखत आहेत. मात्र महान क्रांतीकारक तात्या टोपे सारख्या कुटुंबातील कुणीही सत्तास्थानी नाही, हे दुर्दैव आहे. देश स्वातंत्र्यानंतरही पाच वर्ष १६ दिवस त्यांना गुन्हेगार म्हणून जगावे लागल्या या समाजातील अनेकांना आजही राशनकार्ड,  बँक माहित नाही.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ३१ ऑगस्ट १९५२ मध्ये सोलापूर जिल्ह्यात काटेरी तारेच्या कुंपणामध्ये राहणाऱ्या ‘गुन्हेगार जमातींना’ तारेचे कुंपणातून कायमचे मुक्त केले. तेव्हापासून पुढे या जमातीस ‘विमुक्त जमाती’ म्हणून ओळख मिळाली.

सोलापूर शहरात भटक्या लोकवस्ती

भटक्या जमातींना एका काटेरी तारेच्या कुंपणात गुलामा सारखे डांबून ठेवले जात असे, यात पुरुष, स्त्रिया व लहान मुले यांचा समावेश होता. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाहेर जाताना हजेरी द्यावी लागत असे. ब्रिटिशांनी याला ‘सेटलमेंट’ असे नाव दिले. आजही आपल्याला या ‘सेटलमेंट’ नाव असलेल्या लोकवस्तीचा सोलापूर शहरात प्रत्यय येतो. अशा अनेक ‘सेटलमेंट’ या काळात भारतात अस्तित्वात होत्या. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करता अशा प्रकारच्या ‘सेटलमेंट’मध्ये एकूण १४ जमातींचा समावेश होता. यात प्रामुख्याने  रामोशी, राजपूत भामटा, कंजारभाट, कोल्हाटी, वडार, पारधी, बंजारा, बेरड, बेस्तर, कैकाडी, लमाणी, काटबु, छपरबंद, वाघरी या जमातींचा समावेश होतो. अशा या भटक्या विमुक्त जातीचा ३१ आॅगस्ट हा स्वातंत्र दिवस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com