Nanded News : तृतीयपंथीयांना मिळाली हक्काची स्मशानभूमी

भवनासाठीही जागा बहाल; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश निर्गमित
transgender got their rightful cemetery collector abhijit raut nanded
transgender got their rightful cemetery collector abhijit raut nanded Sakal

नांदेड : राज्यात प्रथमच एक नवा निर्णयाचा आदर्श नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्माण केला आहे. ‘‘आम्हीही माणसं आहोत, आमचेही तसेच रक्त आहे, आम्हीही कुणाचे भाऊ - बहिण आहोत’’ अशी तृतीयपंथीयांची आर्त हाक ऐकुण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आता त्यांना त्यांच्या हक्काच्या स्मशानभुमी व किन्नर भवनासाठी जागा वितरणाचे आदेश निर्गमीत केले.

मागील अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन दिवाळीच्या पर्वावर ही नवी सामाजिक न्यायाची अपूर्व भेट मिळाल्याबद्दल तृतीयपंथीयांच्या संघटनांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नांदेडमधील तृतीयपंथीयांनी सामाजिक न्याय विभागाकडे स्वताच्या हक्काची स्मशानभुमी व किन्नर भवनसाठी जागा मिळावी, अशी मागणी काही वर्षांपासून लावून धरली होती. सामाजिक न्याय विभागाने ही मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. व त्यांनी देखील विशेष लक्ष दिले.

राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाप्रमाणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना मतदान कार्ड व स्वत:चे आधार यासह इतर कागदपत्रे देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

त्यानंतर त्यांना शहरालगत म्हाळजा परिसरात १.४५ हेक्टर आर जमीनीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार नांदेड तहसीलदार यांना निर्देश देऊन या जमिनीचा आगाऊ ताबा सहायक आयुक्त समाज कल्याण यांना देण्याचे आदेशीत केले आहे. ही जमीन अतिक्रमण मुक्त, निर्विवाद आहे.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नांदेडचे उपजिल्हाधिकारी विकास माने, नांदेडचे तहसीलदार संजय वारकड, तहसीलदार विजय अवधाने, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, भूमी अभिलेख अधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर तत्परतेने प्रक्रिया पूर्ण करून कर्तव्य बजावले. किन्नरांच्या प्रश्नांबाबत येथील सेवाभावी संस्था कमल फाउंडेशन यांनीही समन्वय साधला होता.

प्रशासकीय पातळीवर अनेक संवेदनशील प्रश्नांना हाताळावे लागते. तृतीयपंथीयांचा विषय हा प्रशासनाच्या दृष्टीने तेवढाच भावनिक व संवेदनशील होता. अनेकदा त्यांच्याबाबत घेतलेले चांगले निर्णय काही प्रसंगी बदलावे लागतात. स्मशानभूमीसारखा अत्यंत महत्त्वाचा व तेवढाच गरजेचा असल्याने हा निर्णय व जागा देण्याचे आदेश पारीत करताना नकळत एक आत्मिक समाधान लाभले.

- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी

जो जन्म वाट्याला आला त्याबद्दल कोणतीही तक्रार न करता आम्ही किन्नर, तृतीयपंथी जीवनातले सुख, दु:ख साजरे करतो. आमच्या हक्काची ही अनेक दिवसांपासूनची मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पूर्ण करून आम्हाला दिवाळीची भेट दिली. आता मृत्यूनंतर कुठे विलीन व्हायचे, याची चिंता राहिली नसून हक्काच्या स्मशानभूमीत माणूस म्हणून विसावता येईल. शासनाचे आभार मानावे तितके कमीच आहेत.

- फरिदा शानूर बकश, किन्नर (तृतीयपंथी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com