नांदेडमध्ये ट्रॅव्हल बस-दुचाकीची समोरासमोर धडक,तिघे गंभीर जखमी

नांदेड जिल्ह्यात मोटारसायकल व ट्रॅव्हल्सच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नरसी-मुखेड रस्त्यावरील गडग्याजवळ शुक्रवारी (ता.१५) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.
Accident
Accident

नायगाव (जि.नांदेड) : मोटारसायकल व ट्रॅव्हल्सच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नरसी-मुखेड रस्त्यावरील गडग्याजवळ शुक्रवारी (ता.१५) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. अपघातातील तिघांची स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. नरसीहून मुखेडकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल बस गडगामार्गे मुखेडकडे जात होती तर गडगा येथून नरसीकडे भरधाव जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने ट्रल्हल्सला दुपारी साडेबाराच्या दरम्यान गडगा येथून एक किमी अंतरावर समोरासमोर जोराची धडक दिली. यात पठाण शादूल सलमान खान (वय २५), शेख मजहर (२४) व रमजान शेख (२३) तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सदरच्या अपघाताची माहिती समजताच गडगा बिटचे जमादार सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Accident
गायब विरोधक दसरा-दिवाळी बघून येतात, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेला पाचारण करुन सर्व जखमींना नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पण जखमींची स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एकाच मोटारसायकलवर तिघे होते. मोटारसायकल भरधाव वेगात जाऊन ट्रॅव्हल्सला समोरासमोर धडक दिली. यात तिघेजण गंभीर जखमी तर झालेच पण ट्रव्हल्सचेही बरेच नुकसान झाले आहे. शुक्रवारी विजयादशमी असल्याने अनेकजण पूजाअर्चा करण्याच्या कामात व्यस्त असल्याने या अपघाताच्या घटनेने शासकीय यंत्रणेची चांगलीच पळापळ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com