esakal | साडेचारशे कोरोना बाधितांवर उपचार सुरु, गुरुवारी ५१ पॉझिटिव्ह, ५९ रुग्ण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी (ता. पाच) प्राप्त झालेल्या ९२६ अहवालापैकी ८७१ निगेटिव्ह, ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, तर ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

साडेचारशे कोरोना बाधितांवर उपचार सुरु, गुरुवारी ५१ पॉझिटिव्ह, ५९ रुग्ण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. गुरुवारी (ता. पाच) प्राप्त झालेल्या ९२६ अहवालापैकी ८७१ निगेटिव्ह, ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, तर ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 

बुधवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर व ॲन्टीजन टेस्ट किट स्वॅब तपासणीद्वारे ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ हजार ३३७ वर पोहचली आहे. गुरुवारी यशवंतनगर येथील ६५ वर्षीय महिलेचा विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील मृत्यूची संख्या ५१९ वर पोहचली आहे. 

हेही वाचा- खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले नांदेडला येणाार ​

१८ हजार १९९ कोरोना बाधितांची आजारावत मात 

गुरुवारी दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील १९, श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- पाच, एनआरआय भवन - गृह विलगीकरण कक्षातील- १६, हदगाव - एक, मुखेड - तीन, नायगाव- सात, बिलोली - दोन व खासगी कोविड केअर सेंटर मधील सहा असे ५९ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १८ हजार १९९ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेडमध्ये घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास अटक

४५१ स्वॅबची तपासणी सुरु 

नांदेड मनपा क्षेत्रात - ४३, नांदेड ग्रामीण - दोन, हदगाव- एक, अर्धापूर - दोन व लातूर - तीन असे ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधिताचा अकडा- १९ हजार ३३७ इतका झाला असून, त्यापैकी १८ हजार १९९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४५३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णापैकी ३४ कोरोना बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ४५१ स्वॅबची तपासणी सुरु होती. शुक्रवारी त्याचा अहवाल येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे माहिती दिली. 

कोरोना मीटर -

आज पॉझिटिव्ह - ५१ 
आज कोरोनामुक्त - ५९ 
आज मृत्यू- एक 
एकुण पॉझिटिव्ह रुग्ण - १९ हजार ३३७ 
एकुण कोरोनामुक्त - १८ हजार १९९ 
एकुण मृत्यू - ५१९ 
उपचार सुरु - ४५३ 
गंभीर रुग्ण - ३४ 
स्वॅब तपासणी सुरु - ४५१