राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली वृक्षतोड; आता कधी होणार वृक्षलागवड ?..

नांदेड ते जळकोट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि लोहा ते मुखेड जाणाऱ्या राज्य महामार्ग या दोन्ही रस्त्याच्या कामाचे ठेकेदार हे वेगवेगळे असून या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यालगत असलेल्या विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या झाडांचा अडथळा दाखवत शेकडो झाडांवर कुऱ्हाडीचे घाव चढवले गेले आणि अमानुषपणे वृक्षतोड केली गेली.
वृक्षतोड
वृक्षतोड

फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : नांदेड ते फुलवळ मार्गे जळकोट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग (National Highway) आणि लोहा ते फुलवळ मार्गे मुखेड जाणाऱ्या राज्य महामार्ग तयार करण्यासाठी सदर दोन्ही रस्त्यांच्या लगत असलेल्या अनेक छोट्या मोठ्या झाडांच्या कत्तली करुन मोठ्या प्रमाणावर दीड वर्षांपासून वृक्षतोड करण्यात आली. याच दोन्ही रस्त्यांच्या बाजूने नवीन वृक्ष लागवड (Road side tree) करण्यात येणार असल्याचे संगण्यातही आले होते. परंतु अद्यापही कुठेच वृक्ष लागवडीचे काम चालू नसून शासनच झाडे लावा, झाडे जगवाचा फतवा हाती घेऊन मिरवत असतानाच याच शासकीय कामावरच वृक्ष लागवडीची होत असलेली परवड पाहून वृक्ष व निसर्गप्रेमीकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नांदेड ते जळकोट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि लोहा ते मुखेड जाणाऱ्या राज्य महामार्ग या दोन्ही रस्त्याच्या कामाचे ठेकेदार हे वेगवेगळे असून या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यालगत असलेल्या विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या झाडांचा अडथळा दाखवत शेकडो झाडांवर कुऱ्हाडीचे घाव चढवले गेले आणि अमानुषपणे वृक्षतोड केली गेली. त्यावेळी तोडलेली झाडे नेमकी गेली कुठं, कोणाच्या घशात भरली त्यापासून आलेला पैसा कुठे वापरला याचा थांगपत्ता त्या त्या गुत्तेदार आणि त्या त्या अधिकाऱ्यांनाच माहीत. पण त्यावेळी वृक्षतोड तोड होत असताना अनेकांनी अडवणूक केली होती आणि तसा जाब ही विचारला होता परंतु तेंव्हा असे सांगण्यात आले होते की रस्त्याचे रुंदीकरण होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूने नव्याने वृक्षलागवड करण्यात येणार आहे. मग कुठं पाणी मुरतंय कोणास ठाऊक.

हेही वाचा - राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने बुधवार (ता. 19) ला सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आजघडीला आपणच अनुभवतोय आणि ज्वलंत उदाहरणे पाहतोय की ऑक्सिजन अभावी कित्येकांना जीव गमवावा लागत आहे. दरवर्षी सरकार वृक्ष लागवडीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत शासकीय कागदोपत्री आदेश आणि केवळ जाहिरातबाजी करत झाडे लावा, झाडे जगवाचा फतवा मिरवत आहे. एवढेच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमातून, अभियानातून वृक्ष लागवड साठी जनमानसाला जागृत करत आहे. तर मग अशा शासकीय कामावरच असे घडत असलेले प्रकार पाहता दिव्याखालीच अंधार असेच म्हणावे का आओ चोरो बांधो भारा, अधा तुम्हारा आधा हमारा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com