tribal women sarpanch along with her husband beaten over water dispute nanded
tribal women sarpanch along with her husband beaten over water dispute nandedesakal

Nanded News : आदिवासी महिला सरपंचासह तिच्या पतीस जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण

नळाला पाणी सोडताना उठवले का नाही, असे म्हणत आदिवासी महिला सरपंचासह तिच्या पतीस जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मेंडकी येथे २६ जानेवारीला घडली.

माहूर : नळाला पाणी सोडताना उठवले का नाही, असे म्हणत आदिवासी महिला सरपंचासह तिच्या पतीस जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मेंडकी येथे २६ जानेवारीला घडली. याप्रकरणी महिला सरपंचाने दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलिसांत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

माहूर तालुक्यातील मौजे मेंडकी येथील भिल्ल आदिवासी समाजातील महिला सरपंच आशा किसन हातमोडे (वय २६) यांनी शनिवारी (ता.२७) माहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मेंडकी येथे त्या सरपंच पदावर सहा महिन्यापासून कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी साडेसातला ध्वजवंदनाचा कार्यक्रम होता.

त्यामुळे आदल्या दिवशी (ता. २५) गावाला पाणीपुरवठा व्हावा म्हणून सरपंचाचे पती किसन हातमोडे व पाणीपुरवठा कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यरत होते. पहाटे नळाला पाणी लवकर आल्याने काही मंडळी झोपेतच होती.

नळाचे पाणी आले व गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील किशोर भगवान राठोड याने पाणी सोडताना मला उठवले का नाही, असे म्हणत सरपंचाशी वाद घातला व शिवीगाळ करून मारहाण केली. संशयित किशोर भगवान राठोड व संजय भगवान राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com