महामार्गावर ट्रक उलटून चालक, सहचालक ठार

हदगावजवळील घटना
Truck Overturn
Truck OverturnSakal

बरडशेवाळा (ता. हदगाव) - ट्रक उलटल्याने चालकासह सहचालकाचा मृत्यू झाल्याची घटना महामार्गावरील बरड शेवाळा (ता. हदगाव, जि. नांदेड) येथे दरबार भोजनालयाजवळील बायपासवर गुरुवारी (ता. २ ) दुपारी घडली. नागपूरहून लोखंडी रॉड घेऊन ट्रक उमरखेडमार्गे लातूरकडे जात होता. बरड शेवाळा गावाजवळ तो उलटला. महामार्गावरून जाणाऱ्‍या प्रादेशिक परिवहनचे अधिकारी धोबळे व त्यांचे सहकारी कोरे यांनी माणुसकीचे दर्शन घडवीत आपले वाहन थांबवले.

घटनास्थळी आलेल्या तरुणांच्या मदतीने जखमी चालक शेख आसीफ शेख गुलाब (वय ३८, रा. लातूर) यांना उपचारासाठी हदगावकडे पाठवले. सहचालक शेख फारुख शेख जिलानी (२२, रा. फरदपूर, ता. रेणापूर, जि. लातूर) यांच्या अंगावरच ट्रकमधील साहित्य पडल्याने ते जागीच ठार झाले. मनाठा पोलिसांनी जेसीबी मागवून दोन तासांच्या प्रयत्नानतर त्यांचा मृतदेह बाहेर काढला. तो उत्तरीय तपसणीसाठी हदगावकडे पाठवला.

दरम्यान, उपचारासाठी हजगावकडे नेत असताना चालक शेख आसीफ यांचा वाटेतच मृत्यू झाला तर सहचालाकचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मनाठ्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक चिट्टेवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मधुकर पवार, जमादार गिरी, कर्मचारी गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com