दोन जिल्हा परिषद गटात बाराशे घरकुले मंजूर

माहुरातील खासगी दलालाच्या हस्तक्षेपामुळे वाई बाजार लटकले
Home
HomeSakal

माहूर - प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत माहूर तालुक्यातील वानोळा व वाई बाजार जिल्हा परिषद गटात २०२१-२२ मध्ये एकूण अकराशे ९३ इतक्या घरकुलाचा कोटा मंजूर करण्यात आला असून अधिकांश ठिकाणी प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मंजूर झालेल्या घरकुल यादीत वारंवार फेरबदल करण्याचा प्रयत्न केल्या गेल्याने वाई बाजार या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत एकही घरकुल मंजूर नसल्याची धक्कादायक माहिती पंचायत समिती बांधकाम विभागाने दिली आहे.

२०१९ मध्ये झालेल्या ऑनलाइन कुटुंब सर्वेक्षणानुसार लाभार्थ्यांची विविध टप्प्यावर चाळणी करून पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी सीईसीसी प्रणालीनुसार निवडण्यात आली. या यादीनुसार माहूर तालुक्यातील वानोळा व वाई बाजार जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींना तब्बल अकराशे ९३ लाभार्थ्यांचा घरकुल कोटा मंजूर करण्यात आला असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा घरकुलाचा दिव्य स्वप्न साकार झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

दुसरीकडे वाई बाजार सारख्या तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतसाठी प्रवर्ग निहाय अनुसूचित जाती १६, अनुसूचित जमाती २३ व इतर १८ लाभार्थ्यांसाठी एकूण ५७ घरकुलाचा कोटा पंचायत समिती स्तरावर लालफितीत अडकला आहे. कारण ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्यानंतरही ग्रामपंचायत वर आपली सत्ता असल्याची अवास्तविक कल्पना करणाऱ्या खासगी दलालांच्या चलाखीने वारंवार मागची नावे पुढे करण्याच्या प्रयत्नात लेखन प्रमाद केलेल्या याद्या सादर केले जात असल्याने वाई बाजार येथील पात्र लाभार्थ्यांचे घरकुल लटकले असून क्रमवारीनुसार मागे असलेल्या लाभार्थ्यांकडून लवकरात लवकर घरकुल देण्यासाठी चिरीमिरी जमा केल्या गेल्यामुळे संपूर्ण वाई बाजारचे लाभार्थी आवास योजनेतील घरकुलापासून वंचित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com