crime news
crime newscrime news

Nanded Crime: नांदेडात गावठी पिस्तुलासह दोन आरोपींना अटक

दोन गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे
Published on
Summary

दोन गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे

नांदेड: शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने घेतला जात आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. २६) दोन गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोन्ही आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना शहरातील अंबिका मंगल कार्यालयाच्या पाठीमागे ज्ञानेश्वरनगर येथे दोन व्यक्ती पिस्तुलसह असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना ही माहिती देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदारांना कारवाईसाठी श्री. चिखलीकर यांनी पाठविले.

अंबिका मंगल कार्यालयाच्यामागे असलेल्या बालासाहेब रेंगे यांच्या घरासमोर जाऊन पथकाने गणेश बालाजी सिद्धलवाड (वय २१, रा. भोसी, ता. भोकर) आणि सचिन परमेश्वर शिंदे (वय २०, रा. आष्टी, ता. हदगाव, हल्ली मुक्काम नमस्कार चौक) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता गणेश सिद्धलवाड याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल व खिशात दोन जिवंत काडतुस तर सचिन शिंदे याच्याही कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

crime news
भोकरदनचे माजी आमदार संतोष दसपुते यांचे निधन

दोन्ही आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी दोन्ही आरोपींना भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, गुंडेराव करले, संग्राम केंद्रे, अफजल पठाण, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, गजानन वयनवाड, बालाजी यादगीरवाड, बजरंग बोडके, अर्जुन शिंदे आणि राजवंशी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com