एक पिस्तुल व तलवारींसह दोघांना अटक- अभिजीत फस्के

प्रल्हाद कांबळे
Sunday, 26 July 2020

गुन्हे शोध पथकानी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून विनापरवाना एक पिस्तुल व दोन तलवारी जप्त केल्या.

नांदेड : शहरातील वाढती गुन्हेगारी व पाहिजे असलेल्या आरोपींची शोध मोहिम राबवून वजिराबाद पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून विनापरवाना एक पिस्तुल व दोन तलवारी जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी (ता. २५) सायंकाळी केली. 

शहरातील गुन्हेगारांना सळोकी पळो करुन सोडण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी. गुन्हेगारीला प्रतिबंध घालावा अशा सूचना  वेळोवेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड,    विजय पवार यांनी दिल्या. यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के आणि वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गुन्हे शोध पथक कार्यरत झाले. 

हेही वाचा धक्कादायक : शेवटसुद्धा चांगला नाही, यांच्या गलथान कारभारामुळे करावा लागला ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे हे आपले सहकारी चंद्रकांत बिराजदार, दत्‍तराम जाधव, संजय जाधव, बबन बेडदे, संतोष बेलुरोड, यांना सोबत घेऊन आपल्या हद्दीत गस्त घालण्यास सुरुवात केली. श्री पुंगळे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी नगीना घाट ते बंदा घाट रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन युवकांना संशयावरुन थांबविले. त्यांची अंग झडती घेतली असता दोघांपैकी एका जवळ विनापरवाना परवाना बेकायदेशीररित्या एक पिस्तुल सापडले तर दुसऱ्याच्या हातात तलवार आणि कमरेला खंजर असे घातक शस्त्र पोलिसांनी जप्त केले.

हे आहेत दोन आरोपी

आरोपी विरसिंग उर्फ विरा गुरदेवसिंग तिवाना (वय २३) आणि जगजीतसिंग जसपालसिंग सोढी (वय २०) या दोघांनाही ताब्यात घेऊन हे पथक वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस ठाण्यात त्यांची कसुन चौकशी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या समोर त्यांना हजर करण्यात आले. त्यांनीही त्यांची उलटतपासणी घेतली. हे दोघेही या परिसरात नेहमी गुन्हे करत असल्याचे समोर आले.  

येथे क्लिक कराकोरोना यौध्यांना गौरविणाऱ्यांनाच कोरोनाने हेरले, एकाच कुटुंबातील १३ जण बाधीत

शहरात दहशत पसरविण्याची हिम्मत करु नका - फस्के

सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. शिवले यांनी सांगितले.वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत किंवा शहरात कुठेही विनापरवाना हत्यार घेऊन जर कोणी दहशत पसरवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा अभिजीत फस्के यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested with pistol and two swords nanded crime news