नांदेड जिल्ह्यात पुन्हा दुचाकी चोरीच्या घटना; पोलिसांचे हवे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड शहरातून एक आणि जिल्ह्यातून एक अशा दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केल्यानंतर काही काळ चोऱ्या थांबल्या होत्या पण आता पुन्हा दुचाकीचोर चोऱ्या करू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांसमोर दुचाकी चोरांना पकडण्याचे आव्हान आहे. 

नांदेड जिल्ह्यात पुन्हा दुचाकी चोरीच्या घटना; पोलिसांचे हवे लक्ष

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड -  नांदेड शहरातून एक आणि जिल्ह्यातून एक अशा दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केल्यानंतर काही काळ चोऱ्या थांबल्या होत्या पण आता पुन्हा दुचाकीचोर चोऱ्या करू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांसमोर दुचाकी चोरांना पकडण्याचे आव्हान आहे. 

नांदेड शहरातील विष्णुनगर भागातील ग्रामसेवक जितेंद्र कोलते (वय ४३) यांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात २० हजाराची दुचाकी उभी केली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार कदम करत आहेत. दुसऱ्या घटनेत लिंबगाव ते नांदेड या रस्त्यावर सायाळ (ता. नांदेड) शिवारात संजय धुमाळ यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला शेतकरी पंढरी रामचंद्र धुमाळ (वय ५५, रा. सायाळ) यांनी त्यांची २५ हजार रुपयांची दुचाकी उभी केली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार दामेकर करत आहेत. 

हेही वाचा - माहूरजवळ एसटी बस व ट्रकचा अपघात ; ४३ प्रवासी जखमी

तिघांनी मिळून मारहाण करत ३७ हजार लुटले 
नांदेड - शहरातील शारदानगर भागातून लक्ष्मण यादगिरी मुनीगंटी (वय ३६, रा. इन्कमटॅक्स कॉलनी, शारदानगर) हे मंगळवारी (ता. दहा) बाराच्या सुमारास चालले होते. त्यावेळी तिघांनी मिळून संगनमत करून त्यांना अडवले. त्यांना चाकूने मारून त्यांच्याकडील रोख १७ हजार रुपये, १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, पाच हजाराचा मोबाईल असा एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आनलदास करत आहेत. 

नांदेडला खुनाचा प्रयत्न 
नांदेड - विनायकनगरातील मच्छी मार्केटच्या बाजूस पाण्याच्या टाकीजवळ काटेरी झुडपात गजानन पवार यांना आरोपींनी संगनमत करून पूर्वदुश्मनीच्या कारणावरून चाकूने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या गळ्यावर, मानेवर चाकूने वार करण्यात आल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. सदरील घटना सोमवारी (ता. नऊ) दुपारी तीनच्या सुमारास घडली. याबाबत कल्पना गजानन पवार (वय २६, रा. विनायकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार थोरवे करत आहेत. 

वाळूची चोरी करणाऱ्यावर गुन्हा 
नांदेड - चिलपिंपरी (ता. मुदखेड) येथे गोदावरी नदीपात्रातून मंगळवारी (ता. दहा) दुपारी दोन वाजता विना परवाना आणि बेकायदेशिररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दोन ब्रास वाळू चोरून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी खुजडा सज्जाचे तलाठी विकास गवंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस जमादार एम. व्ही. पवार पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे -  परभणीकरांची पूर्ण दिवाळीच कुडकुडणाऱ्या थंडीत जाणार
 

शिवीगाळ, मारहाण केल्याने गुन्हा दाखल 
नांदेड - देगलूर नाका भागात एम. आर. हॉटेल समोर मंगळवारी (ता. दहा) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अब्दुल अजीम अब्दुल गफार (वय ३६, रा. रहेमतनगर) हे व्यापारी थांबले होते. त्यावेळी आरोपितांनी संगनमत करून प्लॉटचे कमीशन देण्याच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करून थापड बुक्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना उचलून रस्त्यावर आपटल्यामुळे त्यांच्या उजव्या हाताचे मनगटाजवळील हाड मोडले व ते गंभीर जखमी झाले. याबाबत इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेडमधून एका मुलास पळवले 
नांदेड - शहरातील गुरूनगर भागात बुद्धभूषण आनंद गायकवाड (वय १५, रा. पोर्णिमानगर) यास सोमवारी (ता. नऊ) दुपारी तीनच्या सुमारास कोणीतरी पळवून नेले. याबाबत त्याची आई प्रज्ञा गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनलदास करत आहेत. 

loading image
go to top