esakal | Nanded : विक्की ठाकूर खून प्रकरणी दोन महिलांना पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे

Nanded : विक्की ठाकूर खून प्रकरणी दोन महिलांना पोलिस कोठडी

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : गाडीपुरा भागात झालेल्या विक्की ठाकूर खून (Vikki Thakur Killing Case) प्रकरणात गुरुवारी (ता.२२) पोलिसांनी बिघानीया कुटुंबातील दोन महिलांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रवीण कुलकर्णी यांनी या महिलांना दोन दिवस पोलिस कोठडीत पाठविले आहे. शहरातील गाडीपुरा (Nanded) भागात मंगळवारी (ता.२०) सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी गोळ्या व शस्त्राचे घाव घालून विक्की दशरथसिंह ठाकूर (वय ३२) याचा खुन केला. त्यावेळी त्याच्यासोबत सुरज भगवान खिराडे आणि निखिल उर्फ कालू प्रकाश मदने असे दोन युवक होते. या प्रकरणात सुरज भगवान खिराडेच्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.(two women get police custody nanded crime news glp88)

हेही वाचा: तरुणावर प्राणघातक हल्ला, घाटीत उपचारासाठी दाखल

महिला आरोपी अंजली नितीन बिघानिया, ज्योती जगदीश बिघानिया यांना पोलिस उपनिरीक्षक शालिनी गजभारे, सहायक पोलिस निरीक्षक बाळू गिते, पोलिस अंमलदार गौतम कांबळे, दिगंबर पवार आदींनी न्यायालयात हजर केले. यात दोन्ही बाजूने झालेल्या युक्तीवादानंतर न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी अंजली आणि ज्योती बिघानिया यांना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

loading image