दत्ता बापूंनी जमिनीशी नातं कधीच तुटु दिले नाही  

प्रमोद चौधरी
Sunday, 20 September 2020

त्यागी दत्ताबापू यांनी हदगाव आणि हदगावच्या परिसरात आपले खूप मोठे प्रस्थ उभे केलेले आहे. त्यांचे शुक्रवारी हैद्राबाद येथे निधन झाले असून, शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नांदेड : हदगाव येथे श्रीकृष्ण मंदिरचे मठाचे मठाधिपती, हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांनी हैदराबाद येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना जगाचा निरोप घेतला. त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच निस्सीम भक्तावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शनिवारी हजारो भक्तांनी गर्दी केली होती. 

कोविड-१९ मुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिलेल्या आदेशाने अंत्यविधीला होणारी भक्तांची गर्दी टाळण्यासाठी दत्ता बापूंवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. बापूचा जन्म १९३० मध्ये मराठा कुळात झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले. १९४७ च्या दरम्यान बापूंना हदगाव शहरातील ‘महानुभव पंथाच्या’ उखळाई मंदिरात स्वाधीन करण्यात आले होते. तेव्हापासून ते शेवटपर्यंत बापूने उखळाई मंदिरात अहोरात्र सेवा केली. संतरूपी गुणामुळे देशाच्या विविध प्रातांतील त्यांचे भक्त व चाहते बापूकडे येत होते. शब्दांशिवाय कृतीतून तत्त्वज्ञान सांगणारे बापू सदैव आपल्या भक्तांना माया देत असल्याने प्रत्येक समाजातील लोक त्यांना बापूच म्हणत. 

हेही वाचा - हेमाडपंथी मंदिरावर कोसळली वीज

काय सांगतात भक्त
प्रा. डॉ. गणेश शिंदे (श्री दत्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हदगाव) ः
हदगाव येथील कृष्ण मंदिराचे मठाधिपती, हदगाव भूषण, वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांनी जगाचा निरोप घेतला. एक अवलिया आपल्यातून हरवला. सबंध आयुष्यभर ज्यांनी केवळ आणि केवळ समाज हितच पाहिले. स्वतःकडे कधी त्यांनी पाहिलेच नाही. मागच्या २७ वर्षापासून मी त्यांना पाहतो त्यांनी कधी स्वतःला कपडे शिवून अंगावर घातले असतील असे आठवत नाही. कोणीतरी आहेर म्हणून दिलेले कपडेच ते घालायचे. त्यांनी कधी केसाला कंगवा लावल्याचे पाहिले नाही. त्यांनी कधी पायामध्ये वाहन वापरलेली पाहिली नाही. 

हे देखील वाचाच - Video - नांदेडला महापौरपदासाठी मोहिनी येवनकर तर उपमहापौरपदासाठी मसूद खान यांचे अर्ज

जमिनीशी नातं तुटू दिल नाही
कोणत्याही कार्यक्रमांमध्ये, कोणत्याही समारंभात गेले किंवा नेत्यांने मंचावर बोलावून खुर्चीवर बसायला सांगितले तर ते कधीच बसलेले मी पाहिले नाही. ते खाली आम जनतेमध्ये जमिनीवर बसायचे. त्यांनी आपल्या पायाचं असलेलं जमिनीशी नातं कधीच तुटू दिलं नाही. ते रस्त्यावर उभे राहिले तर त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागायची, असे त्यागी दत्ताबापू ज्यांनी हदगाव आणि हदगावच्या परिसरात आपले खूप मोठे प्रस्थ उभे केले आहे. 

येथे क्लिक कराच - लालपरी धावते, मात्र पोटासाठी सारेच थकले

निर्मळ चारित्र्याचा संत
देव उकळाई या नावाने दोन मंगल कार्यालये तसेच  गोरगरिबांचे मुले शिकली पाहिजे हा ध्यास घेऊन अव्याहतपणे एक वसतिगृह त्यांनी सुरु केले. इतकेच नाही तर मंगल कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू कुटुंबांचे विवाह या मंगल कार्यालयात निःशुल्क होत असतात. अत्यंत निष्कलंक, निर्मळ चारित्र्याचा हा संत. हा अवलिया हदगाव आणि नांदेड जिल्ह्यातील लोकांचे श्रद्धास्थान राहिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tyagi Datta Bapu Passed Away In Hyderabad News News