esakal | बेरोजगारांची कोटीची फसवणुक करणारा भामटा पोलिस कोठडीत
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

दाखल गुन्ह्यातील आरोपीला माळाकोळी पोलिसांनी अटक करुन लोहा न्यायालयासमोर दुसऱ्यांदा हजर केले. न्यायाधीश अरगडे यांनी पुन्हा सहा दिवसाच्या (ता. सहा आॅगस्ट) पर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. 

बेरोजगारांची कोटीची फसवणुक करणारा भामटा पोलिस कोठडीत

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आसाम रायफलमध्ये लोहा तालुक्यातील अनेक बेरोजगार युवकांना नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली होती. त्यासाठी त्याने एक कोटीहून अधिक रक्कम हडप करून पसार झाला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपीला माळाकोळी पोलिसांनी अटक करुन लोहा न्यायालयासमोर दुसऱ्यांदा हजर केले. न्यायाधीश अरगडे यांनी पुन्हा सहा दिवसाच्या (ता. सहा आॅगस्ट) पर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आसाम रायफल्समध्ये नोकरीला लावतो म्हणून अनेक युवकांची ३६ लाख रुपयांची फसवणुक केली होती. या प्रकरणी माळाकोळी पोलिस ठाण्यात महेश रमेश कदम रा. मेटीखेडा तालुका कळम, जिल्हा यवतमाळ याच्यासह त्याच्या कुटुंबियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तो गुन्हा दाखल झाल्यासून फरार होता. माळाकोळी पोलिसांनी त्याला ता. २५ जूलै रोजी ताब्यात घेऊन अटक केली. त्याला माळाकोळी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला एक आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले होते. 

हेही वाचा - बदलिधारक शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर, काय आहे कारण? ते वाचाच

एक कोटी दोन लाखाची फसवणुक

आरोपीला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर अनेक युवकांनी पोलिसांच्या आवाहनानुसार आपल्या तक्रारीसुद्धा दाखल केल्या. त्यामुळे आसाम रायफल्समध्ये नोकरी लावण्यासाठी म्हणून या भामट्याने युवकांना एक कोटी एक लाख ९० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी लोहा येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अरगड यांनी पोलिस कोठडीत पाठविले होते. शनिवारी (ता. एक) रोजी त्याची पोलिस कोठडी संपल्याने व पुन्हा नव्याने तक्रारी दाखल झाल्याने परत आरोपी महेश कदम याला न्यायालयासमोर हजर केले.

हे देखील वाचाच - विविध आव्हानांवर मात करत ‘या’ जिल्ह्यात विक्रमी कापूस खरेदी
 
महेश कदम दुसऱ्यांदा सहा दिवस पोलीस कोठडीत 

आसाम रायफल्समध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महेश कदम याच्याविरुद्ध नवीन आलेल्या सर्व युवकांचे मिळून एक कोटी एक लाख ९० हजार रुपये हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याचा विनंती अर्ज माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्रुबा घाटे यांनी केली. लोहा येथील सरकारी वकील गिरीश मोरे यांनी युवकांची झालेली फसवणू मोठी त्यांचा विश्‍वासघात केला आहे. दिलेली रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिस कोठडी मिळणे आवश्‍यक असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर सादर केला. यावेळी न्यायाधीश अरगडे यांनी युक्तिवाद ऐकून महेश रमेश कदमची दुसऱ्यांदा सहा दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.