लोहा येथील आपतीग्रस्त कुरेशी कुटुंबाच्या मदतीला ' खाकी वर्दी ' धावली

गुरुवारी (ता. दहा) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या लोह्यातील नवी आबादी येथील बडेसाब भातनासे कुरेशी यांचे घर गॅस सिलेंडरमुळे उध्वस्त झाले.
पोलिस निरीक्षक तांबे, पोस्टे लोहा
पोलिस निरीक्षक तांबे, पोस्टे लोहा

नांदेड : पोलिस प्रशासनात आता उच्च विद्याविभूषित अधिकारी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती होत आहेत. संवेदशील व सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या अधिकाऱ्यामुळे एकोपा वाढीस लागतो आहे. असेच एक संवेदनशील पोलिस निरीक्षक यांनी जुन्या लोह्यातील गॅस सिलेंडर स्फोटात उध्वस्त झालेल्या कुटुंबियाना आर्थिक मदत केली. काळजीत असलेल्या बडेसाबच्या चेहऱ्यावर " संतोष' पाहायला मिळाला. पण त्याचा कोणताही गाजावाजा होऊ दिला नाही.

गुरुवारी (ता. दहा) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या लोह्यातील नवी आबादी येथील बडेसाब भातनासे कुरेशी यांचे घर गॅस सिलेंडरमुळे उध्वस्त झाले. यात सर्व घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. माजी उपनगराध्यक्ष केशव मुकदम, गटनेता करीमभाई शेख यांचा हा प्रभाग असल्याने घटना कळताच ते मदतीला धावले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, उपजिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटील, पं. स. सदस्य नवनाथ बापू चव्हाण यासह मान्यवरांनी आपतीग्रस्त कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करीत मदतीसाठी हात पुढे केले.

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे श्री संत नामदेव किर्तन महोत्सवास दोनशे दिवस पूर्ण

या सगळ्या भाउ गर्दीत लोह्याचे संवेदनशील पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी या आपतीग्रस्त कुटुंबाला भेट दिली. स्फोट कसा झाला याची बारकाईने नोंद करुन घेतली. घरातील सर्वच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सामजिक बांधिलकी जपणारे अधिकारी पोलिस प्रशासनात येत आहेत. दंडुक्या ' ऐवजी ' दंडात्मक' कारवाई करीत "खल निग्रहणालय' केले जात आहे. अवघ्या दीड- दोन महिन्यातच लोहा शहर व परिसरात त्यांनी गुन्हेगाररावर वचक बसवली तर 'सद् रक्षणालय' ब्रीद पाळले जात आहे.

नवी आबादी भागातील बडेसाब यांचे घर गॅस सिलेंडर स्फोटामुळे उध्वस्त झाले. घटनास्थळी हे पाहताच पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी तात्काळ आर्थिक मदत केली. पंचनाम्याला गेले, आर्थिक मदत करुन आले. पोलिस निरीक्षक तांबे यांच्या मदतीचा हात या आपतीग्रस्त कुटुंबाच्या चेहऱ्यावर "संतोष " फुलविणार ठरला. "खाकी "च्या या सामाजिक दायित्वाचा सकारात्मक संदेश गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com