धोकादायक पुलाचा ग्रामस्थांकडून वापर

nnd07sgp09.jpg
nnd07sgp09.jpg


तामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः पाथरड (ता. हदगाव) येथील नदीवरील पुलाची अवस्था जर्जर होऊन धोकादायक बनली आहे. मोडकळीस आलेल्या या पूलावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून नाईलाजास्तव ये-जा करावी लागत आहे. हा पूल अंदाजे तीस वर्षापूर्वी निर्माण केला असून फुलाच्या वापराची मुदत संपल्यामुळे कालबाह्य मानला जातो. पावसाळ्यात पाथरड नदीला येणाऱ्या पुरामुळे व मोडकळीस आलेल्या या पूलाची उंची कमी असल्याने गावचा संपर्क अनेकदा तुटत असतो. परिणामी नागरिकांच्या प्रवासी सुविधेसाठी उभारण्यात आलेला हा पूल आता मात्र नागरिकांना भीतीदायक वाटत असून जीवावर बेतणार ठरू शकतो. 


मजूर मरण पावल्याची दुर्देवी घटना 
पाथरड नदीचे पात्र व्यापक असून हा पूल अंदाजे १५ पाईपद्वारे तयार केला आहे. सध्या या पुलाची अवस्था भयावह असून पुलावरून नागरिक किंवा वाहनांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. दरवर्षी या पुलाची अवस्था अधिकाधिक बिघडत आहे. ग्रामपंचायतकडून पुलाची डागडुजी करून नागरिकांना होणारा संभाव्य धोका टाळण्याचे प्रयत्न केला जाते. पण तो पुरेसे ठरणार नाहीत. कारण पूलाची दयनीय व गंभीर अवस्था बघून या पुलावर होणारा खर्च निरूपयोगी ठरणार असून आता या पुलाची नव्याने निर्मिती करणे आवश्यक बनले आहे. नवीन पुलासाठीची मागणी ग्रामस्थ दरवर्षी करीत आहेत. पण अद्यापही या पुलासाठी लागणारा मोठा निधी मंजूर होण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. अंदाजे तीन वर्षांपूर्वी या पुलाचा एक भाग कोसळून पुलावरून जाणारे बोअरवेलचे वाहन नदीपात्रात पडून झालेल्या अपघातात दोन परप्रांतीय मजूर मरण पावल्याची दुर्देवी घटना घडली होती. 

पूलाच्या संकटातून मुक्त करावे 
त्या दुर्दैवी घटनेनंतरही पाथरड नदीवरील नवीन पुलाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. या वर्षीच्या पावसाळ्यातील पुरामुळे हा पूल शेवटच्या घटका मोजत आहे. गावातील एकटा-दुकटा या पुलावरून ये-जा करण्याचे टाळत आहे. अनेक पालकांनी शाळेला जाण्यासाठी हा पूल ओलांडावा लागतो म्हणून जोखीम पत्करण्याचे टाळून पाल्याच्या सुरक्षिततेसाठी इतरगावी आपले पाल्य शिकविण्याचे निर्णय घेतले आहेत. शासनाने नागरिकांच्या प्रवासी व जीविताच्या सुरक्षिततेसाठी पाथरड नदीवरील नव्या पूलाच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून ग्रामस्थांना धोकादायक व जर्जर असलेल्या सध्याच्या पूलाच्या संकटातून मुक्त करावे अशी मागणी नागरीकातून होत आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com