esakal | बापाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी पॅरोलवर आलेल्या आरोपीवर प्राणघातक हल्ला !  
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

माझ्या बापाचा खून करुन तो अजूनही गावातच फिरतो. तुला तर संपविलेच पाहिजे. असे म्हणत महादेव प्रल्हाद पांढरे (वय३८) याने पॅरोलवर सुटून आलेल्या आरोपी भगवान शिवाजी पांढरे (वय ५०) वर्ष याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोटात चाकूने व हातावर वार केले. हा धक्कादायक प्रकार घडला तो धोंडराई ता. गेवराई, जिल्हा. बीड जिल्हात. 

बापाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी पॅरोलवर आलेल्या आरोपीवर प्राणघातक हल्ला !  

sakal_logo
By
वैजीनाथ जाधव

गेवराई (बीड) : खूनाच्या गुन्ह्यात अजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले. त्याने गावातील ज्या व्यक्तीचा खून केला होता. त्याच्या मुलाने वडिलांच्या खूनाचा बदल घेण्यासाठी आरोपीवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आरोपी गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना तालुक्यातील धोंडराई येथे घडली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

भगवान शिवाजी पांढरे (वय ५०) वर्ष रा. धोंडराई (ता. गेवराई) असे त्या पॅरोलवर असलेल्या आरोपीचे नाव आहे. दहा वर्षापूर्वी धोंडराईत प्रल्हाद शिवाजी पांढरे यांचा खून झाला होता. या गुन्ह्यात भगवान पांढरे हे आरोपी सिद्द झाल्याने मागील दहा वर्षापासून नाशिकच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सहा महिन्यापूर्वी भगवान यास पॅरोलवर कारागृहातून बाहेर सोडण्यात आले. त्यावेळेपासून तो धोंडराई येथे स्वतःच्या घरी राहत आहे. मंगळवार (ता. सात) रोजी सायंकाळी चार वाजता भगवान ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

असताना मयत प्रल्हाद पांढरे यांचा मुलगा महादेव प्रल्हाद पांढरे (वय३८) वर्ष हा तिथे आला. माझ्या वडिलांचा खून करून सुद्धा तू गावात मोकळा फिरत आहेस, आता तुलाही जीवे मारतो असे म्हणत त्याने खिशातील चाकू बाहेर काढला भगवानच्या पोटात खुपसला आणि हातावरही वार केले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याची माहिती भगवानचा मुलगा सचिन पांढरे याला झाल्यानंतर त्याने ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली असता त्यांना वडील गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताबडतोब त्यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने वडिलांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुन्हा त्यास बीडच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असे सचिन यांनी सांगितले. गेवराई पोलीस ठाण्यात सचिन पांढरे यांच्या फिर्यादीवरून महादेव प्रल्हाद पांढरे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, गाडे, तागड करित आहेत.

(Edited By Pratap Awachar)