esakal | मुदखेड तालुक्यातील विविध विकास कामांचे आ. राजूरकर यांच्या हस्ते भूमिपूजन
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार राजूरकर

मुदखेड तालुक्यातील विविध विकास कामांचे आ. राजूरकर यांच्या हस्ते भूमिपूजन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असून मुदखेड तालुक्यातील मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गोदावरी नदीवर आमदुरा येथे 50 लक्ष रुपये खर्च करुन गोदावरी नदीवर घाट बांधण्यात येणार आहे. त्यासोबतच आमदुरा- चिकाळा- डोणगाव- कोल्हा रस्त्यावरील चिकाळा तांडा जवळील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या कठीण काळातही कंपनीची उलाढाल वर्षभरातच ५० हजारांवरून २.५ कोटी रुपयांवर गेली आहे.

या दोन्ही कामांचे भूमिपूजन आ. अमर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्या अरुणाताई कल्याणे, माजी जि. प. सदस्य रोहिदास जाधव, भीमराव कल्याणे, तालुकाध्यक्ष उद्धव पवार, पिंटू पाटील वासरीकर, मुदखेडचे नगरसेवक माधव कदम, उत्तम चव्हाण, मारोती किरकण, विनोद चव्हाण, साहेबराव गोरखवाड, पंडीत चव्हाण, रोहीत तोंडले, कार्यकारी अभियंता कोरे, उपकार्यकारी अभियंता बालाजी पाटील, शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे, मारोती पवार, नवनाथ पंडीत, दत्तराम पाटील, खंडू पाटील, बिसेनसिंघ नंबरदार, बालाजी पंडित यांच्यासह परिसरातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तंटामुक्तीचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

loading image