Video - ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने नांदेड दुमदुमले 

नांदेडला भक्तांनी केला श्रीरामाचा जल्लोष
नांदेडला भक्तांनी केला श्रीरामाचा जल्लोष

नांदेड - अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी (ता. पाच) झाल्यानंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात श्रीराम जन्मोत्सव समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, बंजरंग दल आदींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करत साखर आणि पेढे वाटप केले.

बुधवारी सकाळपासूनच अनेक रामभक्तांनी घरासमोर रांगोळी काढली. त्यानंतर चौकाचौकात सुरक्षित अंतर ठेवून श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी पेढे आणि साखर वाटण्यात आली. घराघरात रामरक्षा स्तोत्र आणि रामभजन करण्यात आले. 

पदाधिकाऱ्यांनी केली महाआरती
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सामुदायिक महाआरती करण्यात आली. यावेळी नवीनभाई ठक्कर, अमरिकसिंघ वासरीकर, दिलीपसिंग सोडी, गणेश महाजन, इंदरसेठ दायमा, गंगाबिशन कांकर, सनत महाजन, डॉ. कोकरे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते. विवेकनगरला राज्य भाजप प्रवक्ते सुनील नेरलकर, मंडळ अध्यक्ष आशिष नेरलकर आदींच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. शिवशक्तीनगर येथे दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानासमोर नेहा सतेजसिंह राजपूत यांनी रांगोळी काढली. प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेची दिलीप व जयश्री ठाकूर यांनी पूजा केली. याप्रसंगी गोपालसिंग, दिनेशसिंह, राजेशसिंह, रुद्रसिंह तसेच अर्णव, इशानी ठाकूर आदी उपस्थित होते. 

पेढे, साखरेचे केले वाटप
डॉ. नारलावार यांच्या दवाखान्यासमोर सामुदायिक पूजा करून पेढे वाटण्यात आले. यावेळी दिलीप कंदकुर्ते, डॉ. देशमुख, डॉ. राचेवाड, स्वप्नील गुंडावार, आनंद कोटलवार, उदय रायेवार, महेश जैन, संतोष भंडारी आदी उपस्थित होते. श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी रविसिंह बिसेन, गणेश ठाकूर, कालू ओझा, विकास परदेशी, अंगद परदेशी आदी उपस्थित होते. महाराणा प्रताप चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे वाटले. यावेळी दिलीप ठाकूर, सुशीलकुमार चव्हाण, नवल पोकर्णा, महादेवी मठपती, शततारका पांढरे आदी उपस्थित होते. 

आमदार रातोळीकरांनी केली पूजा
रातोळी येथे आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या निवासस्थानी पूजा करण्यात आली. यावेळी आमदार रातोळीकर यांच्यासह पिराजी देशमुख, साहेबराव पाटील, टी. जी. पाटील, शिवराज पाटील, सोमनाथ स्वामी, शिवाजी पाटील, संजय पाटील, जना पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com