
नाटक म्हणजे केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून त्यात विविध भूमिका साकारणारे पात्र काहीतरी संदेश देत असतात. सध्याची कोरोनाविरुध्दची लढाई कशी लढावी, यासाठी विद्यार्थ्यांनी एका ज्वलंत विषयाला हात घालत वेगळा प्रयोग सादर केला आहे.
नांदेड : अदृष्य स्वरुपात मानवाच्या शरिरात प्रवेश करणाऱ्या कोरोना नावाच्या विषाणूने मानवी जिवन विस्कळीत करुन टाकले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून जग आहे तिथेच थांबले आहे. आजही कोरोनाच्या विषाणुवर लस किंवा औषधीचा शोध लागलेला नाही. तेंव्हा प्रत्येक व्यक्तीला कोरोनाला घाबरुन चालणार नाही. खबरदारी घेणे ही प्रत्येकाची गरज झाली आहे.
मास्क, सॅनेटायझर आणि समांतर अंतर राखुन कोरोनाला पळवून लावणे शक्य असल्याचे शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी नाटिकेच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार करा आणि कोरोनाला पळवून लावा, असा संदेश नाटिकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा- अबब...! चक्क पोलिस निरीक्षकालाच मारहाण...कुठे ते वाचा
आॅक्सफर्ड शाळेचे विद्यार्थी म्हणतात ‘कोरोना के साथ जिना है’
कोरोना आजाराला घाबरुन किती दिवस घरात बसायचे या विचाराने शालेय विद्यार्थ्यांपासून ते थोरापर्यंत सर्वांनाच कंटाळा आला आहे. त्यामुळे आता कोरोना जाणार नाही. कोरोनाला हरवण्यासाठी आपन स्वतः खबरदारी घेऊन घराबाहेर पडले पाहिजे आणि कोरोनाला हरवले पाहिजे असा विचार लहान मोठ्यात रुजु लागला आहे आणि म्हणून आॅक्सफर्ड शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘कोरोना के साथ जिना है’, असे म्हणत नाटिका सादर केली आहे.
हेही वाचा- नांदेडच्या ‘या’ आमदारांचा असाही विरंगुळा
मास्क, सॅनेटायझर आणि समांतर अंतराचे महत्व
आॅक्सफर्ड शाळेच्या विद्यार्थ्यांनी भन्नाट अशी नाटिका तयार केली आहे. विशेष म्हणजे या नाटिकेतील सहभागी सर्व पात्र आपापल्या घरी असले तरी, त्यांनी अतिशय उत्तमरित्या अभिनय करुन मास्क, सॅनिटायझर आणि समांतर अंतर काखुन कोरोनाला कसे पळवून लावायचे यासाठीचा हा उत्तम अभियन करुन सर्वांची मने जिंकली आहेत. विद्यार्थ्यांनी वृंदावनातील गवळन आणि पेंद्या यांची पात्र साकारत विना मास्क बाजारात जाणाऱ्या राधेला भररस्त्यात अडवून पेंद्या तिला विना मास्क आणि सॅनेटायझर समांतर अंतराचे महत्व समजावून सांगतो. यासाठी तिचा रस्ता अडवतो, अशा आशयाचे नाटक तयार केले आहे.