Video - मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांनी केला ‘कोरोना’मुळे बदललेल्या आयुष्याचा उलगडा...

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे

नांदेड - जवळपास सर्वच देश आणि नागरिकांना वेठीस धरलेल्या ‘कोरोना’मुळे सगळं जगच बदलून गेलंय. भारतात देखील कोरोना आणि लॉकडाउनमुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरावर नवनवीन प्रश्‍न निर्माण होण्यासोबतच ताणतणावही वाढला आहे. तरी देखील त्यातून मार्ग काढत प्रत्येकाच जगणं सुरु आहे. या ‘कोरोना’मुळे बदललेल्या आयुष्याचा नांदेडमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांनी केलेला हा उलगडा...

जगभरात कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेकजण घरातच बसून आहेत. परिणामी अनेक प्रश्‍न निर्माण झाले. त्यातून आपआपल्या परीने प्रत्येकाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. समाजातील वेगवेगळ्या स्तरावर ताणतणावही वाढला असून अनेकांना आपली जीवनशैली काही काळापुरती का होईना बदलावी लागली आहे. आता कोरोना कधी संपणार? अशी चिंता प्रत्येकालाच लागली आहे. त्यामुळे पुढे काय होणार? या आणि इतर प्रश्‍नांचा उलगडा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मनस्वास्थ हा महत्वाचा विषय 
कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर मनस्वास्थ हा महत्वाचा विषय होता. जवळपास सगळेच जण वेळ नाही...वेळ नाही...बिझी आहे...असे सांगत होते. पण लॉकडाउनमुळे सगळ्यांनाच वेळ मिळाला. एवढेच नव्हे तर आता वेळ कसा घालवावा? हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला. तरी देखील सर्वांनीच आहे या परिस्थितीशी मिळते जुळते घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर त्यातून मानसिक अवस्थाही स्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

दैनंदिन जीवनात झाले बदल
लॉकडाउन असल्यामुळे सर्वांनाच दैनंदिन जीवनात बदल करावे लागले. सकाळी फिरायला जाणारी आणि व्यायाम करणारी माणसे घरीच अंगणात, गच्चीवर व्यायाम करु लागली. घरच्या घरी योगासने करु लागली. मुले देखील शाळा, महाविद्यालये बंद असल्याने आॅनलाईनकडे वळली. त्यांनीही मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण घेणे सुरु केले. अशा पद्धतीने सर्वांच्याच दैनंदिन जीवनात बदल झाले. सर्वच घटकांतील आणि स्तरावरील समस्या आणि नवीन प्रश्‍नही निर्माण झाले. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या परीने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. 

पुढे काय होणार? असा प्रश्‍न सर्वांनाच
कोरोना कधी संपणार? तो कधी जाणार इथपासून ते आता आपले पुढे काय होणार? असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. कोरोनामुळे दैनंदिन जीवनात बदल झाला असला तरी सारं काही आलबेलं झालं का? तर त्याचे उत्तर नाही. अजूनही समाजातील वेगवेगळ्या स्तरावर ताणतणाव आहेच. मूळ ताण तर आहेच पण त्यासोबत अनिश्‍चितता जास्त आहे. त्यामुळे त्यातून कसा मार्ग काढायचा आणि काय काय बदल करायचे? या व इतर अनेक प्रश्‍नांचा उलगडा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप देशपांडे यांनी त्यांच्या या व्हिडिओमधून केला आहे. त्यातून अनेक उत्तरे आपल्याला मिळतील. त्यासाठी हा व्हिडिओ पहा....
 
  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com