esakal | नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारींच्या बातम्या पहा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड क्राईम न्यूज

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारींच्या बातम्या पहा एका क्लिकवर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड तालुक्यातील खडकी येथे अज्ञात चोरट्यांनी एका घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व नगदी पंधरा हजार असा एकूण दिड लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (ता. २५) पहाटे एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी संदीपान ज्ञानोबा गव्हाणे यांच्या फिर्यादीवरुन लिंबगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड करत आहेत.

इतवारा हद्दीतून दोन दुचाकी चोरीला

शहराच्या जुना मोंढा येथील लक्ष्मी कापड दुकानासमोर सार्वजनिक रस्त्यावरील गणपती मंदिराजवळ आपली निळ्या रंगाची एक दुचाकी (एमएच २६-८५०९) लावली होती. ते कापड खरेदीसाठी लक्ष्मी दुकानात गेल्यानंतर त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. बाहेर येऊन पहातात तर आपली दुचाकी नाही. त्यानंतर त्यांनी इतर्त्र शोध घेतला. मात्र सापडली नाही. शेवटी मारुती नारायण कुंडलवार राहणार चिदगिरी तालुका भोकर हल्ली मुक्काम भालचंद्रनगर मालेगाव रोड, नांदेड यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री वाडियार करत आहेत.

हेही वाचा - कोरोनात सोन्याची चमक फिकी; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

देगलूर नाका परिसरातून दुचाकी चोरीला

देगलूर नाका परिसरात फंक्शन हाॅल परिसरात असलेल्या खान हाॅटेलसमोर (एमएच २६- बिके 8386) दुचाकी लावून चहा पिण्यासाठी दुचाकी चालक गेला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरुन नेली. पीर बाबु अब्दुल खादर राहणार रहीमनगर देगलूर नाका यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री वडजे करत आहेत.

तिखट पाणी तोंडावर टाकून मारहाण

किनवट येथे गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे असे की, बोधडी बुद्रुक तालुका किनवट येथील निखिल भगवान मुनेश्वर (वय ३०) हे मिस्त्री काम करुन आपल्या घरी थांबले होते. ही घटना ता. २२ मेच्या रात्री दहाच्या सुमारास घडली. जुन्या वादातून याच गावातील काही जण रात्री साडेदहाच्या सुमारास निखील मुन्नेश्वर यांच्या घरात शिरले. त्यानंतर त्यांच्याशी वाद घालून तिखट पाणी तोंडावर फेकून त्यांना दाबून धरुन धारदार चाकूने डोक्यावर गंभीर वार करुन दुखापत केली. जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चार जणांवर किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक श्री डुकरे तपास करीत आहेत.

येथे क्लिक करा - विक्री केलेल्या मालाचेही पैसे वेळेवर मिळेनात; जिंतूरचे शेतकरी अडचणीत

अकरा वर्षाच्या बालकाचे अपहरण

नांदेड शहराच्या वाहतूकनगर हनुमानगड परिसरातून आयुष सतीश पाईकराव (वय 18 वर्षे 7 महिने) याला अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. त्याच्या घरच्या मंडळीनी त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच सापडला नाही. शेवटी सतीश जनार्धन पाईकराव यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.

चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

उमरी तालुक्यातील कुदळा येथील राहणारा मात्र मागील काही दिवसापासून विष्णुपूरी परिसरात राहणाऱ्या राजेंद्र गंगाधर बिरजे (वय २७) याचा विष्णुपूरी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. ही माहिती त्याच्या नातेवाईकांनी ग्रामिण पोलिसांना दिली. गंगाधर सटवाजी बिरजे यांच्या माहितीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार श्री रामदिनवार करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.