महामार्ग रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे ग्रामस्थ त्रस्त

ठेकेदारांच्या मनमानीपणाचा प्रवाशांना बसतोय फटका
Villagers stricken due to incomplete work of highway roads.
Villagers stricken due to incomplete work of highway roads.

हिमायतनगर - हिमायतनगर शहर ते रेल्वेगेट अंतर्गत रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून रोजचे किरकोळ अपघात घडतच आहेत. एखादा गंभीर अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता पावसाच्या पाण्याने रस्ता चिखलमय बनला असून रविवारी (ता.२६) रोजी या अंतर्गत रस्त्यावर एक ट्रक फसला. या वेळी मोठ्याप्रमाणात दोन्ही बाजूकडून ट्रॅफिक जाम झाल्याने ठेकेदाराच्या मनमानीचा फटका आता प्रवाश्यांना बसत आहे.

हिमायतनगर रेल्वेगेट ते परमेश्वर मंदिर कमान उमरचौक अंतर्गत रस्त्ता निर्मितीचे काम महामार्गाचे गुत्तेदार भाईजी मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कासवगतीने केल्या जात आहे. दोन्ही पेट्रोल पंपाच्या मधोमध असलेल्या एका नाल्याच्या अर्धवट पुलाच्या कामामुळे गेल्या वर्षीच्या पाऊस काळात बऱ्‍याचदा हा मार्ग बंद पडला होता. एकदा तर चक्क आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे ही ट्रॅफिक जॅममध्ये तब्बल दिड तास फसले होते.

आता या अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. ट्रक चालकाने जिकरीचे प्रयत्न करूनही फसलेला ट्रक निघाला नसल्याने वाहतूक अनेक तास खोळंबली होती. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ठेकेदाराकडून होत असलेली कमालीची दिरंगाई प्रवाशांसाठी डोकेदुखी बनली असून जनता ठेकेदार व प्रशासकीय यंत्रणेच्या नावाने शिमगा करीत आहे.

याच रस्त्यांच्या कामासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या दरम्यान झालेल्या आंदोलनाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तेव्हा ठेकेदाराचे प्रतिनिधी यांनी आंदोलन स्थळी उपस्थित होवून एका महिन्यात हा अंतर्गत रस्ता पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ठेकेदाराने प्रशासकीय यंत्रणेच्या उपस्थित तमाम जनतेच्या साक्षीने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. उलट आमदार जवळगावकर यांच्या आंदोलनाला ‘खो’ दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com