esakal | विष्णुपुरी धरण पुन्हा भरले, एका दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - विष्णुपुरी प्रकल्पाचे शुक्रवारी एक गेट उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

विष्णुपुरी धरण पुन्हा भरले, एका दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : शहरातील Nanded गोदावरी नदीवरील विष्णुपुरी Vishnupuri Dam येथील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा मंगळवारी (ता. सहा) रात्री साडेआठ वाजता उघडण्यात आला आहे. त्यातून ४७१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी जून महिन्यात सुरवातीला पावसाने Rain दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील भागात असलेला दिग्रस बंधाराही भरल्यामुळे दुपारी एक वाजता तेथील एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग मंगळवारी करण्यात येत होता. त्यामुळे ते पाणी विष्णुपुरी प्रकल्पात आले आणि पुन्हा रात्री साडेआठ वाजता विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला. विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा मंगळवारी उघडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे यांनी दिली.vishnupuri dam again full, water discharge from one gate nanded updates

हेही वाचा: नांदेडकरांना दिलासा! दिवसभरात फक्त नऊ जण कोरोनाबाधित

एका दरवाजातून ४७१ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात करण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी श्री. शिंगरवाड यांनी दिली. दरम्यान, विष्णुपुरी प्रकल्पाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या नदीकाठच्या गावातील नागरिकांनी मालमत्ता, जीविताची, पशुधनाची व इतर कोणतीही हानी होणार नाही, यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात यावी, असे आवाहन प्रकल्पचे पूर नियंत्रण अधिकारी यांनी दिली आहे.

loading image