बिलोलीत शांततेत मतदान

मतदान केंद्रावर कोविड नियमांचे पालन
बिलोलीत शांततेत मतदान
बिलोलीत शांततेत मतदानsakal

बिलोली : देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीसाठी शनिवारी (ता.३०) रोजी सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. बारा उमेदवारांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले आहे. मंगळवारी (ता. दोन) धनत्रयोदशीच्या दिवशी मतमोजणी होणार आहे. शहरी व ग्रामीण भागात मतदान केंद्रावर बोगस मतदान अथवा मतदान यंत्रातील बिघाडीबाबत कुठल्याही तक्रारी आल्या नाहीत.

देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात एकूण मतदान प्रक्रीयेत पुरुष मतदाराची एकूण संख्या १ लाख ५४ हजार ९२ तर स्त्री मतदारांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार २४६ आहे. इतर ५ (तृतीयपंथी) असे एकूण २ लाख ९८ हजार ३५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. त्यापैकी आज सकाळी ७ ते११ दरम्यान २२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तदनंतर दुपारी तीन पर्यंत ४८.४७ टक्के मतदान झाले. त्यात पुरुष मतदार-७३ हजार २१२ तर स्त्री मतदार ७१ हजार ३९० असे एकूण १ लाख ४४ हजार ६०२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी शहरातील अनेक मतदान केंद्रांना भेट देऊन दुपारी निवडणूक विभागाच्या कार्यालयात मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांच्यासह बिलोलीचे तहसीलदार श्रीकांत निळे व देगलूरच्या तहसीलदारांनी मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याची खात्री करून घेतली. विशेष म्हणजे बिलोली देगलूर मतदार संघात मतदान क्षेत्रात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी दिली.

बिलोलीत शांततेत मतदान
तब्बल १२ लाख पदव्या मुंबई विद्यापीठाच्या डिजीलॉकरवर उपलब्ध

अनेक मान्यवरांची हजेरी

मतदारसंघातील मतदान प्रक्रिया व मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची पदाधिकारी व पुढारी महत्त्वाच्या शहरांना भेटी दिल्या. ज्यामध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार गंगाधरराव पटने, डॉ. अजित गोपछडे, श्रावण पाटील भिलवंडे, शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मीनल पाटील खतगावकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय मुंडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावागावात भेटी दिल्या.

नगरपालिका क्षेत्र निर्णायक ठरणार

देगलूर-बिलोली विधानसभा क्षेत्रामध्ये देगलूर, कुंडलवाडी आणि बिलोली या तीन नगरपालिका महत्त्वाच्या आहेत. या तीन नगरपालिका क्षेत्रातील मतदानाच्या आघाडीवर विजयी उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या तीनही नगरपालिकेत महा विकास आघाडीची सत्ता असल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याची चर्चा मतदानानंतर ऐकावयास मिळत आहे. मात्र मतमोजणीनंतर मतदारांनी कोणाला कौल दिला हा औत्सुक्याचा विषय आहे.

कोविड नियमांचे पालन

कोरोनाच्या भीतीदायक वातावरणात ही पोटनिवडणूक पार पडली असली तरी जवळपास सर्वच मतदान केंद्रावर कोविड नियमांचे पालन करण्यात आले. मतदान कक्षात व कक्षाबाहेर सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क वापरून, थर्मलगणद्वारे मतदारांचे तापमान नोंदवणे याकडे लक्ष देण्यात आले. झोनल अधिकारी व विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर जाऊन चोख बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com