वाई येथे आज १११ जोडपे होणार विवाहबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wai Wedding ceremonies 111 couples will get married

वाई येथे आज १११ जोडपे होणार विवाहबद्ध

वसमत : आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्यात १११ जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या प्रतिष्ठानच्या वतीने तीन वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास नवदाम्पत्य संसारोपयोगी साहित्यही प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येते. यंदा शनिवारी दुपारी १२.३५ वाजता वाई गोरक्षनाथ येथे सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते श्री. पवार यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री संजय बनसोडे, भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू पाटील नवघरे आदींची उपस्थिती राहणार आहे.

सिंहावलोकन पुस्तकाचे प्रकाशन

पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सिंहावलोकन पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी दुपारी एक वाजता कारखाना साइटवर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी केले आहे.

नापिकी, वाढती महागाई आणि लग्नात होणारा खर्च. यामुळे मुलींच्या वडिलांचे आर्थिक गणित बिघडून जाते. अनेकांवर वडिलोपार्जित शेती विकून, व्याजाने पैसे काढून मुलीचे लग्न करण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत वधूपिता पार खचून जातो. त्यामुळे तीन वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा घेत आहे.

- राजू नवघरे, आमदार

Web Title: Wai Wedding Ceremonies 111 Couples Will Get Married Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top