esakal | सावधान : नांदेडकरांनो कन्टेनमेन्ट झोनची संख्या ४० वर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दररोज नव्याने नविन भागात रुग्ण आढळून येत असल्याने कन्टेनमेन्ट झोनचीही संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नांदेडकरांनी सावधानता बाळगणे हाच यावर एकमेव उपाय असल्याचे कन्टेनमेन्ट झोन प्रमुख अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी सांगितले.

सावधान : नांदेडकरांनो कन्टेनमेन्ट झोनची संख्या ४० वर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून नांदेड शहराला सर्वत्र या विषाणूने घेरले आहे. कोरोना बाधीतांची संख्या २५६ वर पोहचली. त्याच वेगाने कन्टेनमेन्ट झोन वाढत आहेत. कोरोना बाधीत रुग्ण बऱ्याच प्रमाणात बरे होत आहेत. मात्र दररोज नव्याने नविन भागात रुग्ण आढळून येत असल्याने कन्टेनमेन्ट झोनचीही संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नांदेडकरांनी सावधानता बाळगणे हाच यावर एकमेव उपाय असल्याचे कन्टेनमेन्ट झोन प्रमुख अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी सांगितले. 

कोरोना संसर्गाचा दिवसेंदिवस अधिक प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शहरात कंटेनमेंट झोनची संख्या ४० वर पोहोचली आहे. तर ग्रामिणमध्येही पाच कन्टेनमेन्ट झोन झाले आहे. दररोज नव्या वस्त्यांमधून रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी कंटेनमेंट झोन जाहीर केले आहे. या झोनमध्ये नागरिकांनी काळजी घेणे हा एकमेव पर्याय असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा -  नांदेडच्या ‘या’ आमदारांचा असाही विरंगुळा

हे आहेत शहरातील कन्टेनमेंट झोन

अबचलनगर, अंबानगर सांगवी, लंगरसाहिब गुरुद्वारा, रहेमतनगर, करबला रोड, कुंभार टेकडी, स्नेहनगर पोलीस कॉलनी, लोहार गल्ली, विवेकनगर, इतवारा, मिल्लतनगर, जिजामाता कॉलनी, जोशी गल्ली, शिवाजीनगर, नई आबादी, रहमान हॉस्पिटल देगलूर नाका प्लॉट, लेबर कॉलनी, उमर कॉलनी, गुलजार भाग, हनुमान मंदिर इतवारा, आर्य विहार आप्पा विद्युतनगर बस स्टॉपजवळ, सिद्धनाथ पुरी, लहुजीनगर वाघाळा, कृष्णामाई अपार्टमेंट तरोडा खुर्द, संभाजी चौक सिडको, अलीनगर खोजा कॉलनी, भगवान कॉलनी हनुमान मंदिर समोर इतवारा, समीराबाग बरकतपुरा परिसर, चिखलवाडीचा काही भाग, सोमेश कॉलनी, झेंडा चौक यासह असे शहरात ४० कंटेनमेंट झोन झाले आहेत. याशिवाय माहूर, किनवट, देगलूर, मुखेड, मुदखेड या तालुक्यातही कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले होते. 

जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून 

एकंदरीत पाहता कोरोना आता आपले हळूहळू पाय पसरवत असून संबंध नांदेड शहरावर कब्जा करू लागला आहे. शहराच्या सर्वच परिसरात रुग्णसंख्या वाढत असल्याने दररोज दोन अंकी संख्या समोर येत असल्याने कंटेनमेंट झोनची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने हे एकंदरीत परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून अजूनही शहरातील नागरिकांचे स्वॅप घेणे सुरू आहे.

loading image