वाहनधारकांनो सावधान : पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सुचनेवरुन वाहतूक शाखा जोमात

file photo
file photo

नांदेड : शहर वाहतूक शाखा ही मागील काही दिवसापासून अंतर्गत कलहामुळे बळी ठरली होती. परंतु आता नक्कीच नूतन पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी याबाबतीत लक्ष घालून शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतुक शाखेला सुचना केल्या आहेत. त्यांच्या सुचनेवरुन वाहतुक शाखा पुन्हा नव्या जोमाने कमाला लागली आहे. दहा दिवसात त्यांनी मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. जड वाहनांसह आदी वाहनांवर कारवाईची मोहिम सुरु केली. पोलिसांच्या सुचनेचे वाहनधारकांनी पालन केले नाही तर त्यांना कडक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. 

मागील काळापासून शहराची विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुंबईसारख्या शहराच्या कामाचा अनुभव या ठिकाणी वापरून पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी यात विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. मागील दहा दिवसात या वाहतूक शाखेने अनेक वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

वाहतुकप्रश्‍नी महत्वाची बैठक बोलाविली होती

शहरातील रस्त्यांची रुंदी व वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेला नेहमीच कसरत करावी लागत आहे. त्यातच रस्त्यावर पार्किंग, नो हॉकर्स झोन, सिग्नल, एकेरी वाहतुक, ॲटो थांबे ही व्यवस्था नसल्याने महापालिका प्रशासनाकडे वाहतूक शाखेने अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र महापालिकेने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या अनौपचारिक चर्चेत पत्रकारांनी त्यांच्यासमोर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक प्रश्‍नी एक महत्वाची बैठक बोलाविली होती. या बैठकिला जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती. 

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार 

या बैठकीत विस्कळीत असलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वच बाजूने यावर पर्याय शोधून नांदेडकरांना व वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरातील महापालिकेने रस्त्यावरील वाढते अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असून संबंधितावर कारवाईचा बडगा उभारणे सुरु केले. रेल्वेस्थानक रोड, कलामंदीर, वजिराबाद, बर्की चौक, जुना मोंढा, देगलुर नाका, जुना गंज, तारासिंग मार्केट, गांधीनगर, वर्कशॉप, तरोडा नाका, अण्णाभाऊ साठे चौक, महाविर चौक, शिवाजीनगर आदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यात फुलविक्रेते, हातगाडे, फळाभाजीपाला विक्रेते यांचा समावेश आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहेस.

वाहनधारकांनी मास्क वापरणे अनिवार्य

पोलीस अधीक्षक यांनी वाहतूक शाखेला सक्त निर्देश दिले आहेत. दुचाकीस्वारासह सर्वच वाहनधारकांनी मास्क वापरावा, विनमास्क दिसल्यास संबंधीतावर कारावई करण्यात येत आहे. वाहतुकीचा नियम तोडणाऱ्या वाहनचालकाचे परवाने निलंबीत करण्यासाठी प्रादेशीक परिवहन विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी वाहनधारकांनी शहर वाहतुक शाखेच्या नियमांचे पालन करावे. मागील पंधरा दिवसात विना मास वापरणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली असून चार हजार ८६५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचे पावले उचलली
 
शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी यांना महानगरपालिकेनी वाहतुक सुरळीत व अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेऊन मतद केली तर हा प्रश्‍न काही अंशी सुटु शकतो. मात्र तशी महापालिकेची इच्छाशक्ती हवी. विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनाही या शहराचा चांगला अनुभव असून यापूर्वी त्यांनी या जिल्ह्यात आपली सेवा केलेली आहे. त्यासाठी त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचे पावले उचलून पोलीस अधीक्षक श्री शेवाळे आणि वाहतूक शाखेला तशा सूचना दिल्या आहेत. यावरुन आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम हे आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरुन वाहतुक व्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com