esakal | का दिला खासदार चिखलीकरांनी बियाणे कंपनीला इशारा?...वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

बनावट बियाणे तयार करणारी आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

का दिला खासदार चिखलीकरांनी बियाणे कंपनीला इशारा?...वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अगोदरच शेतकरी मागील काही वर्षापासून हतबल झालेला आहे. त्यातच लहरी निसर्ग त्यांना साथ देत नाही. एकीकडे लहरी निसर्गाचा फटका आणि त्यातच सोयाबीन बियाणे पुरविणाऱ्या कंपनीच्या लापरवाहीचा त्रास यामुळे शेतकऱ्यांवर पेरणीच्या सुरवातीलाच दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा बेजबाबदार बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करा अन्यथा त्यांना आम्ही जागा दाखु असा इशारा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिला आहे. 

यावर्षीच्या खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून काही कंपन्यांनी बनावट बियाणे बाजारात आणले आहे. अशा बियाण्याची विक्री करून शेतकर्यांनी फसवणूक केली जात असून बनावट बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या आणि ते बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हे दाखल करा अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हेही वाचानांदेडला पावणेतीन लाखांचा गुटखा पकडला

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरण

यावर्षी मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाला असल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या जोमाने सुरू केल्या आहेत. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो शेतकर्यांचा गत वर्षीचा कापूस अद्यापही घरात पडून असला तरी शेतकरी राजांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीला जोमाने सुरुवात केली आहे. उसनवारी करून पेरणी केली जात जात आहे. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने शेतकर्यांचा थेट बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा केली. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक्का दमडीचीही मदत केली नाही. तरीही शेतकरी राजा यावर्षीच्या खरीप हांगमच्या पेरणीला सुरुवात केला आहे. 

शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही

जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणी जोरात सुरू असताना काही शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या दुकानदारांनी बियाणे उगवणीची हमी दिली व ज्या कंपनीने बियाणे उत्तम असल्याचा दावा केला होता त्या कंपनी आणि विक्रेत्यावूरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. 

येथे क्लिक कराकोरोना : महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान

जबाबदार कंपनी आणि व्यापाऱ्यास दंड ठोठावण्यात यावा

दरम्यान नांदेड जिल्ह्यातील ज्या- ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नाही. त्या त्या शेतकऱ्यांना संबधित कंपनी आणि बियाणे विक्रेत्याकडून नुकसान भरपाई द्यावी. शिवाय पेरणीसाठी झालेला शेतकऱ्यांचा खर्च, मानसिक त्रासाबद्दल जबाबदार कंपनी आणि व्यापाऱ्यास दंड ठोठावण्यात यावा. व्यापाऱ्यांच्या दुकानाचे परवाने रद्द करावेत अशी मागणीही खा. चिखलीकर यांनी केली आहे.