निर्वाणरुद्र पशुपतींचा खून का केला, वाचा आरोपीच्या तोंडून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

साधूला त्यांच्याच वाहनात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. २५) दुपारी चार वाजता दिली.

नांदेड : उमरी तालुक्यातील नागठाणा येथील साधू व त्याच्या शिष्याचा पैशासाठी खून करून साधूजवळील रोख रक्कम व किंमती साहित्य लंपास केल्याची कबूली आरोपीने पोलिसांना दिली. साधूला त्यांच्याच वाहनात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. २५) दुपारी चार वाजता दिली.
 
आरोपी साईनाथ लिंगाडे हा मठाधीपती निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य यांचा जवळचा शिष्य भगवान शिंदे याचा मित्र होता. ते दररोज एकमेकासोबत राहत असत. हे मठाधीपती यांना माहित होते. परंतु दोन दिवसांपूर्वी कुठल्यातरी कारणावरून या दोघांचा वाद झाला. यातून जिल्हा परिषद शाळेजवळ शनिवारी (ता. २३) रात्री अकराच्या सुमारास भगवान शिंदे याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृत्देह शाळेच्या शौचालयात नेऊन टाकला. त्यानंतर तो घरी गेला. पुन्हा मध्यरात्री मठात आला. यावेळी मठाधीपती हे बाहेर फिरत होते. साईनाथ लिंगाडे हा ओळखीचा असल्याने त्याला त्यांनी जवळ येऊ दिले.

हेही वाचा -  दिलासादायक : नांदेडवरुन विशेष रेल्वेने एक हजार परप्रांतीय मजूर बिहारकडे रवाना
 
फाटकामुळे पुढील अनर्थ टळला

यानंतर लिंगाडे याने मठाधिपतीच्या रविवारी पहाटे दीडच्या सुमारास डोळ्यात तिखट फेकले व त्यांचाही गळा दाबून खून केला. एवढेच नाही तर त्यांचा मृतदेह त्यांची कार ( एमए२६-व्ही- १८००)च्या डीक्कीत टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी कारपळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवेशद्वारातून कार निघाली नाही. कार गेटला लागल्याने आवाज आला. लॅपटॉप, रोख रक्कम, चांदीचे दागिणे आणि कारची किल्ली लंपास केली. याच गावातील एकाला चाकु दाखवून त्याची दुचाकी पळविली. मात्र त्याला तेलंगना पोलिसांनी पकडले. पैशासाठी खून केल्याची कबूली त्याने दिल्याचे श्री. मगर यांनी सांगितले. 

पाच दिवसाची पोलिस कोठडी

लिंगाडे याच्याकडून दुचाकी, चोरलेले पैसे, दागिणे असा एक लाख ३० हजाराचा ऐवज जप्त केला. पोलिस उपाधीक्षक सुनील पाटील यांनी सोमवारी (ता. २५) उमरी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, दत्ताराम राठोड, पोलिस उपाधीक्षक सुनील पाटील, डॉ. सिद्धेश्‍वर धुमाळ, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did Nirvana kill Pashupati, read from the mouth of the accused nanded news