कंधारमध्ये का केली महिलेनी आत्महत्या? वाचा सविस्तर...

प्रल्हाद कांबळे
Friday, 31 July 2020

ही घटना पांगरा तांडा (ता. कंधार) येथे ता. २६ जूलै रोजी घडली होती. उपचारादरम्यान पिडीत महिलेचा नांदेडच्या विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात ता. २९ जूलै रोजी मृत्यू झाला.

नांदेड : नात्यातील व्यक्तींना दिलेले हात उसने दिलेले चार लाख रुपये वेळेत परत न करता उलट बेदम मारहाण करुन मानसिक त्रास दिल्यामुळे एका महिलेनी विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना पांगरा तांडा (ता. कंधार) येथे ता. २६ जूलै रोजी घडली होती. उपचारादरम्यान पिडीत महिलेचा नांदेडच्या विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात ता. २९ जूलै रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात नऊ जणांवर आत्महत्येस परावृत्त केल्याप्रकरणी गुरुवारी (ता. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कंधार तालुक्यातील पांगरा तांडा येथील रहिवासी सुनिता विजय जाधव व तिच्या पतीने कैलास पंडित जाधव यास दोन वर्षांपूर्वी दोन लाख रुपये ट्रॅक्टर   घेण्यासाठी व नंतर ऊसतोडणीची उचल म्हणून दोन लाख असे एकूण चार लाख रुपये दिले होते. सदर घेतलेली रक्कम आमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सुनिता व तिचा पती विजय जाधव हे दोघेजण हातउसणे दिलेले चार लाख रुपये परत मागितली. परंतु ही रक्कम देण्यास कैलास जाधव हा टाळाटाळ करु लागला. एवढेच नाही तर घेतलेले चार लाख रुपये परत न करता आरोपीने संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमवून शेतात काम करणाऱ्या सुनिता जाधव व तिच्या पतीला मारहाण केली. एवढेच नाहीत तर तुझे संबंध माझ्या मुलासोबत आहेत असे म्हणून आरोपी महिला विमलबाई जाधव हिने मारहाण केली. 

हेही वाचाकोरोना : नांदेड जिल्ह्यात दीड लाख लोकांचे सर्वेक्षण

लोहा पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

सुनिता जाधव ही खाली पडल्यानंतर पंडित जाधव यांनी पोटावर काठी जबर मारुन दुखापत केली. यावेळी अरविंद जाधव, मोतीराम उर्फ बाळू जाधव,    सतीश जाधव व राजू जाधव यांनी मिळून सुनीता व तिच्या पतीला बेदम करत मारहाण केली. हा वाद वाढतच गेल्याने केवळाबाई जाधव व जयश्री जाधव यांनी दगडाने मारुन सुनिता जाधव हिला जखमी केले. हा अपमान सहन न झाल्याने सुनिता जाधव हिने ता. २६ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास आपल्या शेतातील कापसाच्या फवारणीवर आणलेले विषारी औषध प्राशन केले. तिला पतीने लगेच कंधार येथील सरकारी रुग्णालयात दाखल करुन प्रकृती गंभीर बनत चालल्याने पुढील उपचारासाठी विष्णुपुरी, नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना सुनिता जाधव हिचा ता. २९ जुलै    रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ प्रसाद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक भागवत जायभाये करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did a woman commit suicide in Kandahar Read more nanded crime news