Good News- नांदेडमधील महिलांना आता ‘भरोसा सेल’चा आधार

प्रल्हाद कांबळे
Saturday, 11 July 2020

अत्याधूनीक यंत्रणेसह ‘भरोसा सेल’ कार्यान्वयीत होत आहे. पीडीत व कौटुंबीक छळाबाबत एकाच छताखाली संबंधीतांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.

नांदेड : जिल्ह्यात महिला, मुलींवर वाढते अत्याचार व कौटुंबीक हिंसाचारच्या घटनांत कमालीची वाढ होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी व महिलांना सुरक्षीत वाटेल असे वातावरण तयार करण्यासाठी नांदेड पोलिस दलाच्या वतीने नव्याने अत्याधूनीक यंत्रणेसह ‘भरोसा सेल’ कार्यान्वयीत होत आहे. पीडीत व कौटुंबीक छळाबाबत एकाच छताखाली संबंधीतांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. तसेच मराठवाड्यातील अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा पहिलाच जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले. 

नांदेड जिल्हा हा क्षेत्रफळाने मोठा आहे. जिल्ह्यात एकूण ३४ पोलिस ठाणे कार्यरत आहेत. तसेच हा जिल्हा तेलंगना, कर्नाटक या राज्याच्या सिमेला लागून असल्याने सिमावर्ती भागात अनेक गंभीर गुन्हे घडतात. विशेष करून महिलांसंदर्भात गुन्ह्यांची मालिका मोठी आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षाच्या माध्यमातून सुखी संसारात आलेले वितुष्ट संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्याय येतो. मागील वर्षी जवळपास १६८ विस्कटलेल्या संसाराची घडी बसवून देण्यास या कक्षाची महत्वाची भुमिका आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक पीडीत महिलेला हे ठिकाण आपले माहेर वाटावे असे माझे पोलिस कर्मचारी त्यांना वागणूक देतात. 

हेही वाचा -  संचारबंदी म्हणजे संचारबंदीच, उल्लंघन केल्यास...विजयकुमार मगर

आरोपीला शिक्षेपर्यंत पाठविण्याची मदत होणार 

लहान बालिकांवर अत्याचार, विनयभंग, हरवलेल्या मुली आणि इतर गुन्ह्यातील पीडीतांना आता भरोसा सेलच्या माध्यामातून न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे. या भरोसा सेलमध्ये १० महिला कर्मचारी, टाटा इन्स्ट्यूटच्या कर्मचारी, दोन महिला पोलिस अधिकारी कार्यरत राहणार आहेत. एखाद्या पीडीतेला वैद्यकीय सेवा पुरवायची असेल तर याच छताखाली वैद्यकीय सेवा पुरविली जाणार आहे. काही गुन्ह्यात पोलिस ठाण्यात गेलेल्या महिलांना किंवा मुलींना आपल्यावर झालेला अन्याय सांगण्यास संकोच वाटतो. तो संकोट या ठिकाणी सर्वच महिला असल्याने गुन्ह्याचे नेमके कारण समजणार आहे. त्यामुळे प्रकरण न्यायालयात टिकून आरोपीला शिक्षेपर्यंत पाठविण्याची मदत होणार आहे. 

येथे क्लिक करा Video- आश्‍चर्य: एका कसायाच्या तावडीतून सोडून दुसऱ्या कसायाच्या दावणीला..

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे राहणार लक्ष 

पीडीत महिलांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष तज्ज्ञ म्हणून पोलिस दलातील काही महिला पोलिस अधिकारी आणि टाटा इन्स्ट्यूटच्या कर्मचारी या ठिकाणी राहणार आहेत. एवढेच नाही तर याच छताखाली शहरातील गस्त घालणारे दामिणी पथकाचे नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. या भरोसा सेलच्या माध्यमातून आता पीडीत महिलांना न्याय मिळणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपाधीक्षक (गृह) डॉ. सिध्देश्‍वर धुमाळ, स्थागुशाचे द्वारकादास चिखलीकर यांचे लक्ष राहणार आहे. या सेलचे उद्घाटन रविवारी (ता. १२) सायंकाळच्या सुमारास करण्यात येणार असून त्याची सर्व तयारी करण्यात आली असल्याचे विजयकुमार मगर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women in Nanded now have a 'trust cell' base nanded news