esakal | Womens day 2021 : मुक्ताबाई पवारच्या बंजारा हस्तशिल्पाची केंद्राकडून दखल; संतोषकुमार

बोलून बातमी शोधा

file photo}

नुकतेच भारत सरकारचे सहायक निदेशक ( हस्तशिल्प ) संतोषकुमार यांच्याकडून त्यांच्या कलेतून निर्माण झालेल्या हस्तशिल्पाची पाहणी करुन कौतुक केले. तसेच या शिल्पकलेची केंद्र सरकार दखल घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Womens day 2021 : मुक्ताबाई पवारच्या बंजारा हस्तशिल्पाची केंद्राकडून दखल; संतोषकुमार
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : भारत देश हा विविध धर्म, भाषा, वेशभुषा व पंथामध्ये विभागला असून देशात अनेक कला जोपासणारे दर्जेदार कलागुण असलेली मंडळी आहे.लोककलेबरोबरच काही धर्मात त्यांच्या- त्यांच्या पेहरावावरुन शिल्पकला जोपासणारी मंडळी आजही आहे. त्यांच्यामुळेच हा ऐतिहासीक व मनमोहक ठेवा असलेली खरी कला जीवंत असून मागील पन्नास वर्षापासून बंजारा हस्तशिल्पचे काम करणाऱ्या मुक्ताबाई पवार यांची आठवण जागतीक महिला दिनानिमित्त येणे साहजीकच आहे.

वयाच्या सतराव्या वर्षीही त्या बंजारा समाजाच्या वेशभुषेला लागणारे हस्तशिल्प स्वत : तयार करतात. त्यांच्या या शिल्पाची दखल केंद्र सरकारच्या हस्तशिल्प विभागाने घेतली. नुकतेच भारत सरकारचे सहायक निदेशक ( हस्तशिल्प ) संतोषकुमार यांच्याकडून त्यांच्या कलेतून निर्माण झालेल्या हस्तशिल्पाची पाहणी करुन कौतुक केले. तसेच या शिल्पकलेची केंद्र सरकार दखल घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तीनशे वर्षांची जुनी संस्कृती जतन ठेवत विविध शिल्प तयार केले

नांदेड जिल्ह्यातील रामदास तांडा येथील राहणाऱ्या मुक्ताबाई पवार यांनी जवळपास अडीचशे ते तीनशे वर्षांची जुनी संस्कृती जतन ठेवत विविध शिल्प तयार केले आहेत. तयार केलेली सर्व शिल्प संतोषकुमार यांना दाखवण्यात आले. त्यामध्ये कांचळी, गळणू, फुल्या, सराफी कोतळी, ओढणी, कसोट्या, टोपली इत्यादी व स्त्रीभ्रूणहत्यावरील हस्तशिल्प असो की बलात्कारामुळे हतबल झालेल्या मुली व महिला, भारत मातेमुळे शरणागत असलेले चित्रण पद्मपाणी, फ्लाईंग अप्सरा, ग्लोबल वार्मिंग या संकल्पनाचे चित्रांची संतोषकुमार यांनी पाहणी करुन कौतुक केले. यंत्राचा वापर न करता रंगीत धाग्याच्या साहाय्याने चित्रातून ज्या मातेने आपल्या मुलीचे रक्षण केले त्या देशात अलीकडच्या काळात उच्च पदावर पोचल्या.

या कर्तृत्वान महिलांचे चित्र हस्तशिल्पातून

अति उच्च पदावर पोहोचलेल्यांच्या चित्रणांची या वेळी पाहणी करण्यात आली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी, किरण बेदी, अरुणा असफ अली, कमलादेवी चटोपाध्याय, फातिमा बीबी, अमृताकौर, झाशीची राणी, सुचेता कृपलानी, पी. टी. उषा, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर, सोनाबाई पवार आदी कर्तृत्ववान महिलांचे चित्रे मुक्ताबाईंनी बंजारा हस्तशिल्पातून तयार केलेले आहे. 

वृक्षांना, पक्षांना जगवलं व संरक्षण दिलं पाहिजे

जवळपास तीन महिन्यापासून काम करत असलेल्या आधुनिक पद्धतीचे स्कर्टचीही पाहणी करण्यात आली. त्याच बरोबर या भुतलावर वृक्ष असतील तर संपूर्ण धरतीमाता पावसाने ओलीचींब होईल. तसेच वृक्षांना, पक्षांना जगवलं व संरक्षण दिलं तरच भविष्यात पाणी व जीवसृष्टी आनंदात राहु शकेल अशा चित्रणाचे काम चालू आहे. त्यास अजून तीन ते चार महिन्याचा कालावधी लागू शकतो असे मुक्ताबाई यांनी सांगितले. त्यांच्या जवळपास सत्तर वर्षाच्या कालावधीतसुद्धा बंजारा हस्तशिल्पचे काम त्या १० ते १२ तास दैनंदिन करीत असतात. संतोषकुमार यांनी या प्रसंगी भारत सरकारकडे या ठिकाणी आपण करीत असलेल्या जुन्या संस्कृतीची नोंद व्हावी यासाठी शिफारस करतो असे सांगितले व करीत असलेल्या कार्याचा युवती व महिलांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले. 

शिल्पग्रामसाठी दीड एकर जागा मोफत

यावेळी मुक्ताबाई पवार यांचे पुत्र प्रा. डी. आर. पवार यांची यावेळी उपस्थिती होती. एवढेच नाही तर मुक्ताबाई पवार यांनी शिल्पग्रामसाठी स्वत: च्या मालकीची रामदास तांडा (ता. लोहा) येथील दीड एकर शेती शासनास विनामोबदला दान केली. या ठिकाणी शिल्पग्राम उभारु असे आश्वासन संतोषकुमार यांनी दिले.