जागतिक चिमणी दिन : चिमुकल्यांनी केली चिमण्यांसाठी पाण्याची सोय

हिप्परगा (शहा) येथील विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
world sparrow day children provided water to sparrows nanded
world sparrow day children provided water to sparrows nandedsakal

कुरुळा : बहुतांश वेळा मोठ्यांनी बाळबोध घ्यावा अस काही वेळा सहज बोलल्या जातं ते चुकीचं नसेलच कदाचित. कारण चिमुरड्या बालकांच्या काही कृतीच एवढ्या स्तुत्य असतात की, मोठ्यांनी त्यातून बोध घ्यावा अशी त्यांची प्रतिभा असते. एकीकडे आधुनिकीकरणामुळे निसर्गातील जैविक अजैविक गोष्टीला पारखी होणारी पिढी तर दुसरीकडे ग्रामीण भागात जैवविविधता जोपासण्यासाठी सरसावलेले चिमुकले हात. जे ‘जिवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीचा अंगीकार करून आपल्या चिमुकल्या हातांनी चिमण्यांसाठी दाना पाण्याची सोय करतात.

हा अनुकरणीय असा स्तुत्य उपक्रम हिप्परगा (शहा) येथील शाळेत पाहायला मिळतो.कुरुळा येथून जवळच असणारी हिप्परगा (शहा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविधांगी उपक्रम राबवत असते. ज्याची हिप्परगा गावासह परिसरात चांगलीच चर्चा असते. गुणवत्ता वाढीबरोबरच येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित उपक्रम राबवले जातात. सद्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत असून दाह शमवण्यासाठी पक्षी प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहेत. दररोज अंगणात, शाळेच्या परसात चिमण्यांचा चिवचिवाट होतो तेंव्हा चिमण्यासाठी धान्य व पाण्याची सोय करण्यासाठी ही लहान बालके सरसावली आहेत.

इयत्ता पाचवीत शिकणारा घनश्याम जायेभाये, तेजस्विनी कदम, अनुष्का जायेभाये, राजनंदिनी कदम, प्रतीक मोरे आदी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडावर चिमण्यांसाठी धान्य पाण्याची सोय केली. निसर्गाचा पर्यायाने जैवविविधतेचा अविभाज्य असणाऱ्या या चिमण्या जगल्या पाहिजेत. उन्हाळ्यात सगळीकडे पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोरडेठाक पडल्याने त्यांना पाणी मिळत असेल का? असा प्रश्न पडल्याने आम्ही त्यांच्यासाठी पाण्याची सोय करत असल्याचे येथील विद्यार्थी सांगतात. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी या चिमुकल्यांनी राबवलेला उपक्रम मोठ्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारा आहे. आशा प्रेरणादायी उपक्रमासाठी वर्गशिक्षक शिवसांब गणाचार्य, दत्तात्रय मोहिते, एकनाथ कांबळे, नामदेवराव कल्यानकस्तुरे व मुख्यद्यापक भास्कर गुट्टे आदी गुरुजन विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. विद्यार्थ्यांत प्राणिमात्राप्रती जागवली जाणारी ही भूतदया खरोखरच आदर्श आणि स्तुत्य आहे.

चिमण्यांचे संवर्धन झाले पाहिजे

आपण या पर्यावरणाचे काही देणं लागतो या भावनेने आम्ही दर वर्षी शालेय वातावरणात तसेच परिसरात अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबवत असतो -नव्हे हे आमचे कर्तव्यच आहे. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार घडावेत व पर्यावरणातील घटकांचे वृक्ष, प्राणी, पक्षी, यांचे संरक्षण व्हावे ही काळाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com