कृषी क्रांती योजनेतंर्गत सिंचन विहिरींचे पूजन | Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंचन विहीर
कृषी क्रांती योजनेतंर्गत सिंचन विहीरीचे पूजन

नांदेड : कृषी क्रांती योजनेतंर्गत सिंचन विहीरीचे पूजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत व ‘आझादी के ७५ साल’ अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यामध्ये नवीन सिंचन, तसेच जुन्या विहिरींच्या जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
जिल्हा पषिदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, कृषी व पशुसंवर्धन संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील- रावणगावकर, कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेटे यांच्या निर्देशानुसार सोमवारी (ता. १५) हा कार्यक्रम झाला. धर्माबाद तालुक्यातील येताळा येथे सावित्रीबाई पिराजी ऐगलोड यांच्या विहिरीचा जलपूजनाचा कार्यक्रम सोमवारी (ता. १५) घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा रेड्डी- सतपलवार उपस्थित होत्या.

हेही वाचा: नाशिक : उघड्यावरील उच्च दाबाच्या वीजतारांमुळे अपघाताला निमंत्रण

राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुसूचित जमातीअंतर्गत नवीन सिंचन विहीर समराळा येथे राजाबाई भोजमोड यांच्या नवीन सिंचन विहिरीच्या कामाचा प्रारंभ पद्ममारेड्डी सतपलवार याच्या हस्ते करण्यात आला. राजापूर येथे चंद्रकांत वाघमारे यांच्या हस्ते गंगाधर चरकेवाड यांच्या नवीन सिंचन विहिरीच्या जलपूजनाचा, तर ज्योती जगजीवन पिटलेवाड यांच्या नवीन सिंचन विहिरीच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी राजापूर येथील शेतकरी, पंचायत समिती सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top