
Newly Married Youth Jumps into River Within 4 Months of Marriage Case Registered
Esakal
पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्यानं नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. आत्महत्येआधी तरुणानं ११२ या क्रमांकावर फोन करून पोलिसांना पत्नी त्रास देत असल्याचं सांगितलं होतं. तब्बल अर्धा तास तो पोलिसांशी बोलत होता. पत्नी खूप छळ करते. घरात वाद घालते. मला जगायचं नाही, तिच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय असं त्यानं म्हटलं होतं. यानंतर गोदावरी नदीत उडी घेत आयुष्य संपवलं. त्यानं नदीत उडी घेतल्यानंतर २ दिवसांनी घटनास्थळावरून ५ किमी अंतरावर नदी पात्रात मृतदेह आढळून आला.