धक्कादायक..! हॅलो दादा मी नदीमध्ये उडी मारतोय...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख वसीम हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नांदेड येथे राहत होता, लॉकडाउनच्या काळामध्ये तो धर्माबादला आला होता. तो अभ्यास करण्यासाठी दररोज आपली मोटार सायकल घेऊन बाभळी बंधारा परिसरात जात होता, असे त्याच्या भावाने सांगितले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नेहमीप्रमाणे तो बाभळी बंधारावर गेला. चौकीदाराने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो विद्यार्थी दररोज अभ्यासाला येतो व बसून अभ्यास करून परत जातो म्हणून चौकीदाराने याकडे फारसे लक्ष दिले नाही. 

धर्माबाद, (जि. नांदेड) ः शहरातील फुलेनगर येथील शेख वसीम शेख मोईन (वय २४) या विद्यार्थ्याने बाभळी बंधाऱ्यावरून गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२६) घडली असून त्याचा मृतदेह २४ तासानंतर शनिवारी मिळाला आहे. या घटनेमुळे धर्माबाद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख वसीम हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नांदेड येथे राहत होता, लॉकडाउनच्या काळामध्ये तो धर्माबादला आला होता. तो अभ्यास करण्यासाठी दररोज आपली मोटार सायकल घेऊन बाभळी बंधारा परिसरात जात होता, असे त्याच्या भावाने सांगितले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नेहमीप्रमाणे तो बाभळी बंधारावर गेला. चौकीदाराने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो विद्यार्थी दररोज अभ्यासाला येतो व बसून अभ्यास करून परत जातो म्हणून चौकीदाराने याकडे फारसे लक्ष दिले नाही. 

हेही वाचा -  कोरोनावर मात करण्यासाठी आयुष काढा- अधीष्ठाता डाॅ. यशवंत पाटील -

शेख वसिम याने बाभळी बंधाऱ्याच्या मध्येभागी जाऊन आपली टोपी, चष्मा, मोटार सायकलची चावी वर ठेवून आपल्या भावाला फोन करून सांगितले की, बाभळी बंधाऱ्यावर येऊन मोटरसायकल, माझा मोबाईल, चष्मा घेऊन जावे मी नदीमध्ये उडी मारीत आहे, असे सांगून त्याने नदीमध्ये उडी घेतली.

ही घटना समजताच पोलिस निरीक्षक सोहन माछरे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक साहेबराव नल्लेवाड, नागुलवार यांनी मच्छीमारांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली. परंतु मृतदेह मिळाला नाही. मात्र शनिवारी (ता.२७) दुपारी मृतदेह फुगून वर आल्यामुळे सदरील मृतदेह बाहेर काढून कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेमुळे धर्माबाद तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Student Suicide By Jumping Into Godavari River, Nanded News