Nanded|फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला टिप्परने उडवलं, उपचार सुरु असताना मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Nanded|फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला टिप्परने उडवलं, उपचार सुरु असताना मृत्यू

नांदेड : टिप्परने उडवल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. नांदेडमधील (Nanded) लोहा येथील कंधार रस्त्यावर ही घटना घडली. बसवराज शिवराज सोनवळे ( वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी, ३० एप्रिल रोजी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या बसवराजला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवल होतं. यात तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी नांदेड येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आज बुधवारी (ता.चार) रुग्णालयात त्याचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. तरुणाला उडवणाऱ्या टिप्परचा शोध अद्यापही पोलिसांना लागलेला नाही. (Youth Died In Accident In Loha Of Nanded)

हेही वाचा: Aurangabad News | पैठणमध्ये पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह लोह तहसील कार्यालयात नेला होता. आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची त्यांनी सांगितले.

पदवीचे शिक्षण

बसवराज सोनवळे हा तरुण पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो विज्ञान शाखेत होता. लोहा येथील शिक्षक शिवराज सोनवळे यांचा तो मुलगा होता. कंधार रस्त्यावर दररोज मोठ्या संख्येने नागरिक सकाळी फिरण्यासाठी जातात. बसवराज हा देखील नियमितपणे सकाळी फिरण्यास जात असे.

हेही वाचा: Nanded | धक्कादायक ! नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

मात्र शनिवारी सकाळी तो कंधार रस्त्यावर एका बाजूने जात असताना टिप्परने त्याला चिरडला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला दवाखान्यात दाखल केले व कुटुंबीयांना घटनेविषयी माहिती दिली.

Web Title: Youth Died In Accident In Loha Of Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :LohaNandedaccident news
go to top