नांदेड - नांदेड शहरातील रहीमपुर वसरणी येथील २५ वर्षीय युवक शेख समीर शेख महेबुब याला एजंटमार्फत नोकरीच्या नावाखाली कंबोडीयात नेऊन क्रिप्टो करन्सी स्कॅममध्ये अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तो सुखरूप मायदेशी परतला आहे.