टोमॅटोची निर्यात यंदा निम्म्याने घटली 

residentional photo
residentional photo


नाशिक-, छत्तीसगड, गुजरात, हरियाना, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेशातील 1 लाख 46 हजार हेक्‍टरपैकी टोमॅटोच्या क्षेत्रात 12 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तसेच सप्टेंबर-ऑक्‍टोंबरमधील पावसामुळे मध्यप्रदेशात 13 आणि कर्नाटकमध्ये 7 टक्‍क्‍यांनी टोमॅटोचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या टोमॅटोचा महाराष्ट्राच चेंदामेंदा झाला. या साऱ्याचा परिपाक म्हणजे, टोमॅटोची निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटली. 
गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबरअखेरपर्यंत देशातून 1 लाख 212 टन टोमॅटोच्या निर्यातीतून शेतकऱ्यांना 259 कोटी मिळाले होते. यंदा गेल्या 9 महिन्यात झालेल्या निर्यातीतून शेतकऱ्यांना 90 कोटींचे परकीय चलन मिळाले आहे. देशातंर्गत बाजारपेठेत ऑक्‍टोंबर 2018 मध्ये 4 लाख 43 हजार 290 टन टोमॅटोची विक्री झाली. त्यास क्विंटलला 1 हजार 568 रुपये असा भाव मिळाला. गेल्यामहिन्यात साडेतीन लाख टन टोमॅटोची 2 हजार 861 रुपये क्विंटल भावाने विक्री झाली.

राज्यामध्ये मोठा माल उपलब्ध

गेल्यावर्षीच्या तुलनेत टोमॅटोच्या भावात एका महिन्यात क्विंटलला तेराशे रुपयांनी वाढ झाल्याचे दिसते. मुळातच, देशातील एकुण उत्पादनाच्या 90 टक्के उत्पादन आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, हरियाना, हिमाचल प्रदेशामध्ये घेतले जाते. जानेवारी ते ऑक्‍टोंबर 2018 मध्ये 34 लाख 51 हजार 410 टन टोमॅटो विक्रीसाठी आला होता. यंदा याच कालावधीत 25 लाख 83 हजार 80 टन टोमॅटोची विक्री झाली आहे. म्हणजेच, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 10 महिन्यात 8 लाख 68 हजार 330 टन कमी टोमॅटो विक्रीसाठी उपलब्ध झाला. आता पावसाच्या नुकसानीमुळे सर्वसाधारणपणे 57 लाख टनांपैकी किती टोमॅटो विक्रीसाठी येणार याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. 

पुण्यात 10 अन्‌ मुंबईत 16 रुपये 
आग्रामध्ये आज किलोभर टोमॅटोचा भाव 18 रुपये असा राहिला. गेल्यावर्षी 29 नोव्हेंबरला 9 रुपये 70 पैसे या भावाने टोमॅटो विकला गेला होता. गेल्यावर्षी 8 रुपये किलो भावाने पुण्यात विकलेले टोमॅटो आज दहा, तर मुंबईत 6 रुपये किलो भावाचे टोमॅटो 16 रुपये किलो भावाने विकले आहेत. 29 नोव्हेंबर 2018 चा आणि आजचा किलोभर टोमॅटोचा भाव रुपयांमध्ये अनुक्रमे असा ः चेन्नई-13-19, देवास-8-11, गाझियाबाद-14-17, इंदूर-8-10, कोलकोत्ता-18-27, लखनऊ-10-17, पाटणा-14-19. दरम्यान, 2018 मध्ये निर्यात झालेल्या टोमॅटोतून मिळालेले परकीय चलन कोटींमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात यंदाचे महिनानिहाय परकीय चलन कोटींमध्ये दर्शवते) ः जानेवारी-5.32 (7.89), फेब्रुवारी-3.73 (4.45), मार्च-4.25 (3.52), एप्रिल-3.83 (2.61), मे-4.11 (3.07), जून-6.18 (4.39), जुलै-17.16 (16.18), ऑगस्ट-23.99 (18.80), सप्टेंबर- 40.82 (28.26), ऑक्‍टोंबर-76.20, नोव्हेंबर-57.21, डिसेंबर-16.38. यंदाचे गेल्या आणि या महिन्याच्या टोमॅटोच्या निर्यातीतून मिळालेल्या परकीय चलनाची आकडेवारी केंद्राकडे अद्याप उपलब्ध झालेली नाही. 
.. 

देशात आवक झालेला टोमॅटो 
(आकडे टनामध्ये दर्शवतात) 

महिना 2018 2019 
जानेवारी 3 लाख 15 हजार 2 लाख 39 हजार 
फेब्रुवारी 2 लाख 77 हजार 2 लाख 9 हजार 
मार्च 2 लाख 73 हजार 2 लाख 11 हजार 
एप्रिल 2 लाख 39 हजार 2 लाख 9 हजार 
मे 3 लाख 3 हजार 2 लाख 7 हजार 
जून 3 लाख 38 हजार 2 लाख 28 हजार 
जुलै 3 लाख 92 हजार 2 लाख 64 हजार 
ऑगस्ट 4 लाख 17 हजार 3 लाख 3 हजार 
सप्टेंबर 4 लाख 50 हजार 3 लाख 57 हजार 
ऑक्‍टोंबर 4 लाख 43 हजार 3 लाख 50 हजार 
नोव्हेंबर 3 लाख - 
डिसेंबर 2 लाख 75 हजार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com