घरी करा कचऱ्यापासून कंपोस्ट खत अन् मिळवा घसघशीत सुट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

नाशिक ः सौरऊर्जा वापराला चालना देण्यासाठी शासनाकडून घरपट्टीत पाच टक्के सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर नागरिकांनी घरामध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्याची सोय केल्यास अशा नागरिकांना घरपट्टीत सवलत दिली जाणार असून लवकरच त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला जाईल. 

नाशिक ः सौरऊर्जा वापराला चालना देण्यासाठी शासनाकडून घरपट्टीत पाच टक्के सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर नागरिकांनी घरामध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्याची सोय केल्यास अशा नागरिकांना घरपट्टीत सवलत दिली जाणार असून लवकरच त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला जाईल. 

शहराचा विस्तार होत असताना मुलभूत सुविधा पुरविण्यावर ताण निर्माण होत आहे. त्यात महापालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. महापालिकेला "ब' वर्ग प्राप्त झाल्याने चौदा हजार पदांचा नवीन आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. परंतु तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी अद्यापही त्यावर निर्णय होत नाही. दुसरीकडे वाढत्या शहरात कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. '

साडेसातशे टन कचरा संकलन

पाच वर्षात सातत्याने कचरा संकलनात वाढ होत आहे. सध्या 255 घंटागाड्यांच्या माध्यमातून साडेपाचशे टन कचरा संकलित केला जातो. संकलित केलेला कचरा खत प्रकल्पात घंटागाडीद्वारे नेला जातो. कचरा डेपोमध्ये त्यावर प्रक्रिया होऊन खत निर्मिती केली जाते. महापालिकेने कचऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी खत प्रकल्प सुरू केला.

गुड न्युज- आता खासगी वाहनांनाही सीएनजीचा फायदा

 कचरा डेपोच्या बाजूला वेस्ट टू एनर्जीतर्फे वीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढत असल्याने घरामध्येच कंपोस्ट खत करता येईल, याबाबत महापालिकेने यापूर्वी नियोजन केले होते. परंतु नागरिकांकडून प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत साशंकता होती. त्यामुळे योजनेला चालना देण्यासाठी कंपोस्ट खतनिर्मिती करणाऱ्या ग्राहकांना घरपट्टीत सवलत दिली जाईल. 

बांधकाम कचऱ्यावर प्रक्रिया 
शहरात जुने नाशिक, पंचवटी दोन मोठे गावठाण असून यात वाड्यांची संख्या मोठी आहे. वाड्यांच्या जागी नवीन इमारती उभ्या राहत असल्याने वाड्यांबरोबरच बांधकामांचा कचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो. नवीन ठिकाणी इमारत तयार होत असताना त्यातूनही मोठ्या प्रमाणात बांधकामाचा कचरा बाहेर पडतो. त्यामुळे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणेदेखील महत्त्वाचे असल्याने बांधकाम कचऱ्यापासून नवीन उत्पादने तयार करता येतील का? याचेही नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. 

सौरउर्जा उपकरणे वापणाऱ्यांना घरपट्टीत सवलत दिली जाते, त्याच धर्तीवर कंपोस्ट खतनिर्मितीला चालना देण्यासाठी घरपट्टीत सवलत देण्याचा विचार सुरू आहे. 
- राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news compost khat in nashik