आता खासगी वाहनांनाही सीएनजी इंधनाचा फायदा 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

महापालिकेकडून शहरात चारशेपैकी दोनशे बस सीएनजी इंधनावर चालविल्या जाणार आहेत. परंतु त्यापूर्वी शहरात सीएनजी स्टेशन उभारणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेडने सीएनजी स्टेशन उभारण्याचे काम सुरू केले आहे. प्रारंभी फक्त बससाठी सीएनजी स्टेशन असेल, असे गृहित धरण्यात आले होते. परंतु आता महापालिकेच्या बससोबतच खासगी वाहनांसाठीही सीएनजी इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

नाशिक : शहरात नव्याने सुरू होणाऱ्या शहर बससेवेसाठी सीएनजी स्टेशनची निर्मिती होत असताना त्याचा फायदा खासगी वाहनांना होण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने सात सीएनजी स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची सीएनजी स्टेशनची नाशिककरांची मागणी पूर्ण होणार आहे. 

शहरासह जिल्ह्यात सतरा स्टेशनची निर्मिती 

महापालिकेकडून शहरात चारशेपैकी दोनशे बस सीएनजी इंधनावर चालविल्या जाणार आहेत. परंतु त्यापूर्वी शहरात सीएनजी स्टेशन उभारणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेडने सीएनजी स्टेशन उभारण्याचे काम सुरू केले आहे. प्रारंभी फक्त बससाठी सीएनजी स्टेशन असेल, असे गृहित धरण्यात आले होते. परंतु आता महापालिकेच्या बससोबतच खासगी वाहनांसाठीही सीएनजी इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. बससाठी नाशिक रोड, सिन्नर फाटा व तपोवन येथे तीन डेपो उभारले जाणार आहेत. तर खासगी वाहनांसाठी पंचवटीतील अग्निशमन केंद्र, चेहेडी येथील जुन्या ट्रक टर्मिनस व आडगाव येथे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाजवळ सीएनजी स्टेशन उभारले जाईल. 

ग्रामीणमध्येही सीएनजी विस्तार 
सध्या नाशिक- पुणे महामार्गावरील दोडी शिवार व घोटीजवळ दोन सीएनजी स्टेशन कार्यान्वित आहेत. त्याव्यतिरिक्त 15 नवे स्टेशन सुरू होतील. महापालिकेच्या बससेवेसाठी दोन, नाशिक शहरात सात, तर उर्वरित सहा स्टेशन ग्रामीण भागात असतील.  

हेही वाचा > गंगापूर धरणावरील त्या बोटीच्या शोध लागणार? 

हेही वाचा > पत्नीच्या निधनानंतर बाप पोटच्या मुलीसोबतच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CNG fuel available to private vehicles Nashik Marathi News