Navratri Festival 2019 : चोगाडा तारा छबीला तारा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

शनिवारी आणि रविवारी अनेक कार्यालये तसेच शाळांना सुट्टी असल्याने रासदांडिया आणि गरबा खेळण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक येत्या शनिवारी व रविवारी अनेक संस्थांनी गरबा व रासदांडियाचे आयोजन केले आहे. यावेळी अनेकांचा कल हा स्पर्धांकडेही आहे. 

नाशिक : रविवारपासून (ता. 29) नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्स सुरु झाल्यापासूनच शहरांतील विविध मंगल कार्यालये तसेच विविध चौकाचौकांत सुरु रासदांडिया व गरबाच्या गाण्यांवर तरुणाईने चांगलाच ठेका धरल्याचे दिसून येत आहे. शहरातील नंदनवन लॉन्स, श्रद्धा लॉन्स, ठक्कर्स डोम यांसारख्या विविध ठिकाणी गरबा व रासदांडियाच्या स्पर्धाही सुरु आहेत.

लहानग्यांपासून ते वयोवृद्धांना आकर्षण 

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरात उल्हासाचे वातावरण दिसून येत आहे. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण या सोहळ्यात सहभागी होतांना दिसून येत आहे. गणेशोत्सवानंतर तरुणाईला वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. त्यासाठी जवळपास गेल्या महिनाभरापासूनच गरबा आणि रासदांडिया कार्यशाळाही घेण्यात आल्या होत्या. केवळ सरावच नाही तर आपल्या नृत्यासाठी योग्य पेहराव आणि त्यावर साजेसे दागिने घेण्यासाठी तरुणाई आख्खी बाजारपेठ पिंजून काढत होती. 

शनिवारी व रविवारी गर्दीची शक्‍यता 
शनिवारी आणि रविवारी अनेक कार्यालये तसेच शाळांना सुट्टी असल्याने रासदांडिया आणि गरबा खेळण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक येत्या शनिवारी व रविवारी अनेक संस्थांनी गरबा व रासदांडियाचे आयोजन केले आहे. यावेळी अनेकांचा कल हा स्पर्धांकडेही आहे. 

बॉलीवुड गरब्याचे खास आकर्षण 
गरबा किंवा रासदांडिया म्हटलं की गुजराती गाण्यांवर ठेका धरणारी तरुणाई आठवते. मात्र यंदा शहरभरात बॉलीवुड गरब्याचे खास आकर्षण दिसून येत आहे. गुजराती गाण्यांऐवजी बॉलीवुडमधील प्रसिद्ध गाण्यांवर गरबाप्रेमी थिरकतांना दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: danidya- garba will be rush on saturday sunday