Shardiya Navratri 2022 : नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खरेदी करताना बाळगा सावधगिरी

Navratri Food
Navratri Foodesakal

नाशिक : नवरात्रोत्सव पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रामध्ये महिला नऊ दिवसांचे उपवास करतात. त्यामुळे या काळात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलेली असते. बाजारातही उपवासाचे विविध प्रकारचे पदार्थ विक्री असतात. परंतु, यातून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाचे पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या विभागातर्फे करण्यात आलेले आहे.

सोमवार (ता.२६) पासून घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. नवरात्र म्हणजे आनंदाचा उत्सव आणि धार्मिक व्रतवैकल्यामुळे उत्साह दुणावतो. नवरात्रोत्सवात नऊ दिवस महिला उपवास करतात. उपवासासाठी बहुतांशी महिलांकडून भाविक फळे आणि उपवासाचे पदार्थांना मागणी असते.(Be careful while buying Fast Food in Navratri Nashik )

Navratri Food
पोस्ट ऑफिसची डबल मनी स्कीम, विना टेन्शन कमवा दुप्पट नफा...

उपवासाच्या काळात आरोग्याच्या दृष्टिने विविध पदार्थ बाजारात विक्रीला असतात. परंतु, जर पदार्थ निकृष्ट दर्जाचे असतील तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन फूड पॉयझन होऊन आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही पदार्थ हे उघड्यावरचे असते. त्या पदार्थांमध्ये भेसळीचीही शक्यता नाकारता येत नाही. या काळात फळांनाही मोठ्याप्रमाणात मागणी असल्याने रासायनिक प्रक्रिया करून फळे पिकवून त्यांची विक्री केली जात असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. पाकिटावरील सूचना ग्राहकांनी बारकाईने वाचाव्यात व त्यानंतरच खरेदी करावे, मिठाईजन्य पदार्थांचीही खरेदी पॅकिंगवरील सूचनेनंतरच करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त ग.सु. परळीकर यांनी केले आहे.

Navratri Food
Daughter's Day: या कलाकारांच्या मुली गाजवतायत बॉलीवूड..

भगर खरेदी करताना घ्या काळजी

*भगर वा अन्य पदार्थ खरेदी करताना परवानाधारक/नोंदणीकृतांकडूनच खरेदी करावेत

* पॅकबंद असलेली भगर/उपवासाचे पदार्थ विकत घ्यावेत

* सदर पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बॅचनंबर आदी तपासावा

* पॅकेटवर प्रक्रिया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले, याचे तपशील पाहून घ्यावा, त्यासह बेस्ट बीफोर म्हणजे भगरीची अंतिम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते तेही तपासून व खात्री करूनच खरेदी करावी

* भगरीचे सुटे पीठ खुल्या बाजारातून/हातगाडीवरून विकत घेऊ नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून व नंतर स्वच्छ धुवून त्यानंतरच घरगुती पद्धतीने पीठ तयार करावे

* खरेदी केलेल्या भगर विक्रेत्यांकडून खरेदीचे पक्के बिल घ्यावे

* सकाळी बनविलेले उपवासाचे पदार्थ सायंकाळी वा रात्री खाऊ नये

* उपवासाचे पदार्थ बनविताना स्वच्छ पाण्याचा वापर करा

Navratri Food
अहंकाराचा नाश आणि परमानंदाचा अनुभव हे आहे नवरात्रीचे महत्त्व....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com