Vijayadashami Dasara 2022 : दसऱ्याला विजयादशमी अन् दशहरा का म्हणतात माहितीये? जाणून घ्या महत्व

Vijayadashami Dasara 2022 Information
Vijayadashami Dasara 2022 Information esakal

Vijayadashami Dasara Information : शौर्य आणि विजयाचे प्रतीक असलेला सण म्हणजे दसरा. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रोत्सवातील दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा हा सण आहे. मोठ्या उत्साहात सर्वत्र दसरा सण साजरा केला. जातो. दसऱ्याला 'विजयादशमी', 'दशहरा' असेही म्हणतात. पण दसऱ्याला 'विजयादशमी' अन् 'दशहरा' का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेवू याचे विशेष महत्व.

(Do you know why Dasara is called Vijayadashami and Dussehra 2022 Know importance)

Vijayadashami Dasara 2022 Information
Shardiya Navratri Jalgaon : इंद्रदेवजी नगरात महिलांच्या पुढाकाराने दुर्गोत्सव

'विजयादशमी' का म्हणतात?

यावर ज्योतिष अभ्यासक विजय जोशी सांगतात, दसऱ्याला विजयदशमी म्हटले जाते याबाबत पुराणात काही कथा आहेत. देवी भगवतीचे एक नाव विजया असल्याचा उल्लेख पुराणात आहे. शुंभ- निशुंभाच्या नाशानंतर देवी दुर्गा 'विजया' म्हणूनही ओळखली जाऊ लागली. त्यांच्या नावावरून या दिवसाला 'विजयादशमी' असेही म्हणतात. अश्विन शुक्ल दशमीला जेव्हा नक्षत्रे उगवतात तेव्हा विजयाचा मुहूर्त असतो. यासह धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रभु श्री रामाने लंकाधिपती रावणाचा वध केला होता. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या उत्साहात साजरा केल्याजाणाऱ्या या सणाला विजयादशमी असे म्हणतात. हा काळ सर्व कामांसाठी शुभ आहे. म्हणूनच या दिवसाला 'विजयादशमी' असेही म्हणतात.

Vijayadashami Dasara 2022 Information
Dussehra 2022 : संस्कृती अन् परंपरेच्या विविधतेने नटलेला सण दसरा; जाणून देशात कसा होतो साजरा

दशहरा का म्हणतात?

यावर श्री. जोशी सांगतात, दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशी आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरणे (पराजय) आहे आहेत. दसर्‍यापुर्वीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. यासह श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तो याच दिवशी. दहा मुख असणारा रावण या दिवशी श्रीरामांसमोर धारातिर्थी पडला. तेव्हा दशमुखी रावण हरल्याने याला 'दशहरा' म्हटले जाते अशीही मान्यता आहे.

Vijayadashami Dasara 2022 Information
Dussehra 2022 : संस्कृती अन् परंपरेच्या विविधतेने नटलेला सण दसरा; जाणून देशात कसा होतो साजरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com