Dussehra 2022 : संस्कृती अन् परंपरेच्या विविधतेने नटलेला सण दसरा; जाणून देशात कसा होतो साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dussehra 2022 :

Dussehra 2022 : संस्कृती अन् परंपरेच्या विविधतेने नटलेला सण दसरा; जाणून देशात कसा होतो साजरा

Dasara Puja 2022 : आपल्या संस्कृतीत साडेतीन मुहुर्तांपैकी असलेल्या सण म्हणजे दसरा. अश्विन शुद्ध दशमी म्हणजे नवरात्रातील दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. यंदा बुधवार 5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. शौर्य, विजय, ज्ञान अन् ऐश्वर्याचे प्रतीक असणाऱ्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीची यादिवशी उपासना केली जाते. आपल्या परंपरेमध्ये अतिशय पवित्र मानला जाणारा दसरा सण संपुर्ण देशात विविध प्रकारे मोठ्या उत्साह अन् आनंदात साजरा केला जातो. (Dussehra festival 2022 diversity in culture and tradition in india navratri)

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : या मंत्राने करा नवदुर्गा देवीची उपासना; पापांचा होईल नाश, नियम जाणून घ्या

संस्कृती अन् परंपरेच्या विविधतेने नटलेल्या आपल्या देशात दसऱ्याचा प्रदेशानुसार वैविध्यपुर्ण पद्धतीने साजरा केला जातो. कुठल्या प्रदेशात कशाप्रकारे सण साजरा केला जातो ते आपण जाणून घेवू या.

 छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्र : याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य अन् हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मुघल बादशहा औरंगजेबाविरुद्ध संघर्ष घोषित केला. याच शौर्याचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रात शस्त्र पुजन केले जाते. या दिवशी नव-नवीन वस्त्रे परिधान केले जातात. या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन सोन्याच्या स्वरुपात आपट्याची पाने अन् शुभेच्छा दिल्या जातात.

हेही वाचा: Dasara Puja 2022 : जाणून घ्या दसऱ्याला शस्त्र पुजन का महत्वाचे; होतील हे लाभ

Garba Reference Image

Garba Reference Image

गुजरात : गुजरातेत नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या उत्साह अन् जल्लोषात गरबा- दांडियाच्या माध्यमातून साजरा केला जातो. नवरात्रीत दांडिया होतो, परंतु दसऱ्याच्या दिवशी मुलींच्या डोक्यावर रंगीत घागर ठेवली जाते. या मुलींची समृद्धीची देवी म्हणून पूजा केली जाते. गरबा नृत्य हे सुख आणि समृद्धीसाठी आहे असे गुजराती समाजबांधव सांगतात. या दिवशी फाफडा, जिलेबी असे खास पदार्थ खाल्ले जातात. नवीन कपड्यांबरोबरच खीर, हलवा, मालपुवा असे खास पदार्थ या दिवशी रायत्यासोबत तयार केले जातात.

उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये दसऱ्याला देवाच्या प्रतिकांसह, मनोरंजनासाठी विदूषकांच्या वेशात व्यंगचित्रे आणि पात्रांसह मिरवणूक काढली जाते. उत्तराखंडच्या रामलीलेमध्ये मिरवणूक काढली जाते.

हेही वाचा: Navratri 2022: नवरात्रामध्ये अष्टमीला का असते इतके महत्त्व?

दुर्गा

दुर्गा

पं. बंगाल : पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीत दुर्गादेवीचे पुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दिवशी सुवासिनी महिला एकमेकींना कुंकू लावून शुभेच्छा देतात. यादिवशी महिला एकमेकांना मिठाई खाऊन आनंद साजरा करतात. त्यानंतर एकमेकांच्या भांगेत कुंकू भरतात. देवीचे विसर्जन करण्यापूर्वी देवीच्या कानात गुपचूप नवस केला जातो. ही परंपरा जुनी असली तरी सध्याच्या काळातही दिसून येते आहे.

दसऱ्याच्या दिवशी सिंधी समाजाकडून मुलांवर पहिला मुंडण विधी केला जातो. संस्कारादरम्यान सर्व समाज बांधवांना अन्नदान केले जाते. सिंधी बांधव सांगतात, ही परंपरा जुनी असली तरी सुरू आहे. असे मानले जाते की वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या सणावर, पहिले अपत्य झाल्यानंतर कुटुंबाने त्याचे आयोजन केल्याने त्याचा बालकाला आशिर्वाद प्राप्त होतो.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : तुम्हाला माहिती आहे का? नवरात्रीचा इतिहास श्रीरामाशी संबंधित, जाणून घ्या