Shardiya Navratri 2022 : तुम्हाला माहिती आहे का? नवरात्रीचा इतिहास श्रीरामाशी संबंधित, जाणून घ्या

Shardiya Navratri related to lord Shri Ram
Shardiya Navratri related to lord Shri Ramesakal

Shardiya Navratrotsav 2022 : नवरात्रोत्सवाच्या काळात देवीची उपासना मोठ्या भक्तीभावाने केली जाते. आयु- आरोग्याच्याची प्राप्ती व्हावी, दुःख- रोगांचा नाश व्हावा, यासह आपल्या मनोकामना देवीच्या आशिर्वादाने पुर्ण व्हाव्यात यासाठी देवीला प्रसन्न करण्यासाठी पुजाअर्चा, यज्ञ-यागादी कर्म केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? प्रभु श्रीरामानेही देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीची उपासना केली होती अन् त्यातून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असेही म्हटले जाते. काय आहे नेमका इतिहास ते आपण जाणून घेऊ. (know history of Shardiya Navratri 2022 related to lord Shri Ram)

Shardiya Navratri related to lord Shri Ram
Shardiya Navratri 2022 : दैत्यांचा वध करण्यासाठी देवतांनी दिले देवीला शस्त्र; जाणून कोणी काय दिले

नवरात्रीचा इतिहास भगवान श्री रामाशी संबंधित...

शारदीय नवरात्रोत्सव का साजरा केला जातो, या संबंधी ग्रंथ, पुराण, देवी भागवत अशा ग्रंथांमध्ये अनेक पौराणिक कथा आहेत. याचप्रमाणे एका कथेनुसार नवरात्रोत्सव नऊ दिवस साजरा करण्याची कथा श्री रामाशी संबंधित आहे.

Shardiya Navratri related to lord Shri Ram
Navratri Sanskriti: 'या' पद्धतीने करा देवीला कुंकुमार्चनाचा अभिषेक; देवी होईल आपोआप प्रसन्न

...म्हणून दसऱ्याला रावण दहन केले जाते

यानुसार रावणाने जेव्हा सितेचे अपहरण केले होते तेव्हा त्यांची रावणाच्या लंकेतून मुक्तता करण्यासाठी प्रभु श्रीरामाने रावणाशी युद्ध पुकारले. यानंतर रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आणि सितेला सोडविण्यासाठी, प्रभु श्रीरामाने नऊ दिवस दुर्गा देवीची उपासना केली. दहाव्या दिवशी दुर्गा देवी प्रकट झाली व देवीने प्रभु श्रीरामाला युद्ध जिंकण्यासाठी आशिर्वाद दिला. प्रभु श्रीरामांनी दहाव्या दिवशी रावणाचा वध केला. यानंतर उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. आणि म्हणून अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.

Shardiya Navratri related to lord Shri Ram
Navratri 2022 : नवरात्रीत उपवास केल्यावर होतोय ‘हा’ त्रास; मग हे पेय नक्की प्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com