Fasting During Pregnancy: गर्भावस्थेत नवरात्रीचे व्रत करायचे? मग 'या' गोष्टी विशेष लक्षात ठेवा

गरोदर स्त्रीसाठी उपवास करणे ही गोष्ट खरंच गरजेची आहे का?
Fasting During Pregnancy
Fasting During PregnancyEsakal

सण आणि उत्सव हा तर आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि या अविभाज्य भागाचा स्त्रिया अविभाज्य घटक आहे. प्रत्येक सण आला की स्त्रियांवरील जबाबदारी वाढते. सण उत्सवाच्या अनेक प्रथांची जबाबदारी सुद्धा बहुतांश करून स्त्रियांवरच आहे आणि त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास होय. सण आला की त्याचा उपवास पाळणे हे जणू स्त्रियांच्या आयुष्याचे समीकरण आहे आणि अनेक स्त्रिया उपवास, व्रत वैकल्य मनापासून पाळतात सुद्धा, जी की चांगलीच बाब आहे.पण गरोदर स्त्रीसाठी उपवास करणे ही गोष्ट खरंच गरजेची आहे का?

आधीच शरीर कमकुवत असते आणि त्यात अधिक उपवास करणे स्त्री साठी धोकादायक ठरू शकते का? असे प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. आता नवरात्रीचा (navratri nights) सण येतो आहे आणि या सणात सुद्धा स्त्रिया उपवास ठेवतात. जर गरोदर स्त्री सुद्धा नवरात्रीचा उपवास करत असेल तर तिने काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

Fasting During Pregnancy
Navratri 2022: साडेतीन शक्तीपीठाचा इतिहास नेमका काय आहे?

1) सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गरोदर स्त्रीला सुद्धा नवरात्रीचा उपवास करायचा आहे तर तिने सर्वप्रथम आपल्या रेग्युलर चेकअप करणाऱ्या  डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग उपवास करावा.नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणे टाळावेच.तुमची फारच ईच्छा असेल तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला एक दिवसाचा उपवास ठेवू शकता.

2) गर्भावस्थेत निर्जला व्रत चुकूनही ठेवू नये.

बाळ आपल्या पोटात वाढत असतांना चुकूनही निर्जला व्रत ठेवू नये.असे केल्यास तुमच्या शरिरात कमजोरी वाढू शकते आणि त्याचे दुष्परिणाम गर्भातील बाळावर देखील पडण्याची दाट शक्यता असते.

Fasting During Pregnancy
Navratri 2022 Mehndi Designs: नवरात्रीमध्ये हातावर काढा, भक्तीमय अशा मेहदी डिजाईन

3) एका दिवसाचा उपवास ठेवला तर पोटभर फराळ करावे. तुम्ही नवरात्रीचा एक दिवसाचा उपवास ठेवला तर त्या दिवशी पोटभर फराळ करावे.जसे की फळे खावे,दूध प्यावे,सोबतच ड्रायफूट खावे.नारळ पाणी, ताक असे पेय प्यावे.

Fasting During Pregnancy
Navratri 2022: देवीला प्रिय असणाऱ्या कवड्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे?

4) जर तुम्हाला गर्भावस्थेत थकवा जाणवत असेल तर बिलकुल उपवास करू नये.

तुम्हाला जर थकवा जाणवत असेल किंवा बैचेन होत असेल किंवा इतर कोणताही शारीरिक त्रास होत असेल तर नवरात्रीचा उपवास धरू नये. आपल्या धार्मिक नियमानुसार बाईने अशा दोनजिवाचे असतांना मनोभावे पुजा केली तर देवी तिच्यावर प्रसन्न होऊ शकते.त्यामुळे नवरात्री मध्ये उपवास करावाच हा अट्टहास गरोदर महिलांनी टाळलेलाच उत्तम राहू शकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com