Navratri 2022 : चौथी दुर्गा सामर्थ्यवान देवता पेठेतली फिरंगाई देवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navdurga firangai devi

Navratri 2022 : चौथी दुर्गा सामर्थ्यवान देवता पेठेतली फिरंगाई देवी

नवदुर्गा परिक्रमेतील चौथी देवी म्हणून फिरंगाई देवीचा मान आहे. या देवीला श्री प्रियांगा देवीही म्हणतात. शिवाजी पेठेतील फ्द्माराजे हायस्कूल पिछाडीस देवीचे पुरातन मंदिर आहे. न्यू कॉलेजच्या पिछाडीस फिरंगाई देवीचे मंदीर आहे. पूर्वीच्या काळी फिरंगाई तळे प्रसिद्ध होते. या तळ्याकाठी प्रियांगी देवता प्रसिद्ध आहे. या देवतेला प्रत्यंगिरा म्हणूनही संबोधतात. शब्दांचा अपभ्रंश होवून प्रियंगाचे फिरंगाई असा नामोल्लेख झाला.

हेही वाचा: Navratri 2022 : ‘कोल्हापूर टू नागालँड’ पर्यावरण आणि आदिवासींच्या विकासासाठी झटणारी दुर्गा डॉ.श्रुती कुलकर्णी

प्राचीनकाळी अंगीरस ऋषींकडे संसाराला कंटाळून एक भक्त मुक्ती याचनेसाठी गेला. ऋषींना ध्यानस्थ पाहून बराचवेळ झाल्यावर, कंटाळून ऋषींचे ध्यान थांबवण्यासाठी त्याने घंटानाद केला. ध्यानधारणा भंग झाल्याने ऋषी कोपले व भक्ताला "तु दगड होशील,” असा शाप दिला. भक्ताने दयायाचना करून मोक्षाचा मार्ग विचारला. 

ऋषीनी तपाने तुझ्यात बदल होवून दगडाचे रूपांतर शक्तीदेवतेच्या शिळेमध्ये होईल. असा उःशाप दिला. ती रूपांतरीत शक्तीशिला म्हणजे फिरंगाईदेवी, असा पौराणिक उल्लेख आहे. येथील तळ्याच्या पाण्यांमध्ये गंधयुक्त, क्षारयुक्त, पाण्यांमुळे त्वचारोग बरे होतात, अशी मान्यता आहे.

हेही वाचा: Navratri Recipe: केळीचा रायता कसा तयार करायचा ?

फिरंगाई देवीची मूर्ती उभी व चतुर्भुज आहे. मुर्तीला शेंदूर लावला असून, ती निर्गुण तांदळाशिला आहे. फिरंगाई देवतेचे कामकोबा व खोकलोबा या परिवार देवता आहेत. कर्मभोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता म्हणून ओळखली जाते, हिला पीठ व मीठ अर्पण करण्यांची प्रथा आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक शरद तांबट यांच्या करवीर नवदुर्गा या पुस्तकात आहे. 

या आहेत नवदुर्गा

कोल्हापुरात अंबाबाई मातेच्या दर्शनासोबतच नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. यामध्ये एकांबिका (एकविरा देवी), मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) पद्मांबिका (पद्मावती देवी), प्रियांगी देवी (फिरंगाई) , कमलजा (कमलांबिका देवी), महाकाली (कलांबिका देवी) , अनुगामिनी (अनुगाई देवी), गजलक्ष्मी (गजांबिका देवी), श्रीलक्ष्मी यांचा समावेश आहे.