Sharadiya Navratri 2022: नवरात्रीचे नऊ दिवस वास्तुशास्त्रातल्या या गोष्टींचे पालन केल्याने देवीचा आशीर्वाद मिळू शकतो

देवीच्या स्थापनेची दिशा खूप महत्त्वाची
navratri festival
navratri festivalesakal

नवरात्रीच्या काळात वास्तुच्या अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, कलशाची स्थापना, पूजा आणि इतर अनेक गोष्टींमुळे देवी प्रसन्न होते. नवरात्री दरम्यान देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास ठेवले जातात, मातेची पूजा केली जाते, पण यादरम्यान काही गोष्टींची काळजीही घेतली जाते. कलशाची स्थापना किंवा मातेची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेतली जाते.

या गोष्टींची काळजी घेतल्याने देवीची उपासना सफल होते आणि प्रत्येकाला इश्चीत फळ मिळते

१. हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्ह कल्याण आणि मांगल्याशी संबंधित आहे. त्यामुळे कोणतेही काम सुरू करण्याआधी तिथे स्वतिक काढले जाते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढावे, असे केल्याने घरात मांगल्याचे वातावरण राहते आणि सगळे शुभकारक होते.

२. देवीच्या स्थापनेची दिशा खूप महत्त्वाची आहे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवीची स्थापना करावी. असे केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदते.

३. जर तुम्ही नवरात्रीत हवन-पूजा करत असाल तर ते घराच्या आग्नेय कोपऱ्यात करावे कारण ते अग्निस्थान आहे.

४. नवरात्रीच्या सणात तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर तोही आग्नेय दिशेला लावा, असे केल्याने तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळेल.

५. नवरात्रीच्या संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर ७ कापूर जाळून देवीची आरती करावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते.

६. नवरात्रीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये तुपाचा दिवा लावावा, त्यामुळे घरातील संकट दूर होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो.

७. मातेची पूजा करताना तिला रोजचा नैवेद्य अर्पण करून घरातील सर्वांना खाऊ घाला आणि सात्त्विकतेची काळजी घ्या.

८. नवरात्रीच्या काळात भांडणे होऊ नयेत म्हणून घरात पाण्याने भरलेला कलश ठेवा आणि ते पाणी संध्याकाळी सभोवती शिंपडा, यामुळे घरात शांतता राहील.

९. घराचे अंगण शेणाने सारवले तर घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. जर हे शक्य नसेल तर गायीच्या ७ गौऱ्या टांगून ठेवा.

१०. नवरात्रीच्या काळात लाल चंदनाचा टिळा लावा, घरातील प्रत्येक सदस्याला टिळा लावल्याने, मन आणि आत्मा शांत राहते.

११. पूजा करताना लाल फुले, जास्वंद किंवा कमळाची फुले अर्पण करा. यामुळे देवी प्रसन्न होते. लाल रंग दुर्गा देवीचे प्रतीक आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com